• Download App
    तिहेरी तलाक कायद्यानुसार गुन्हा, सौदी अरेबियातून पत्नीला फोनवरून दिला तलाक|Crime registered in Triple Divorce Act: Divorced wife over phone from Saudi Arabia

    तिहेरी तलाक कायद्यानुसार गुन्हा, सौदी अरेबियातून पत्नीला फोनवरून दिला तलाक

    विशेष प्रतिनिधी

    फतेहपूर (उत्तर प्रदेश) : सौदी अरबहून पत्नीला फोनवरून तिहेरी तलाक दिल्याप्रकरणी पतीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रजिया बानोने तक्रारीत असा आरोप केला की, हुंड्याची मागणी पूर्ण न करता आल्याने तसब्बुलने मला तलाक दिला. याप्रकरणी तसब्बुलसह त्याच्या कुटुंबातील आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी चौकशी केली जात आहे, असे हथगाम पोलिसांनी सांगितले.Crime registered in Triple Divorce Act: Divorced wife over phone from Saudi Arabia

    २१ मे २००५ रोजी बानो आणि तसब्बुल यांचा विवाह झाला होता. विवाहानंतर तसब्बुल आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य तिचा छळ करीत होते. तसब्बुल हा सौदी अरबमध्ये काम करतो. सोमवारी त्याने फोनवरुन तिला तिहेरी तलाक दिला. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी चौकशी केली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.



    इस्लाम धमार्नुसार निकाह म्हणजे विवाह हा करार असून यात महिला व पुरूष या दोघांच्याही अधिकारांना ग्राह्य मानले गेले आहे. इस्लाममध्ये तिहेरी तलाकला तलाक-ए-सुन्नत असे म्हटले जाते आणि हा तलाक महिला व पुरूषांनी सर्वात शेवटचा, सामोपचाराने घटस्फोट घेण्याचा मार्ग म्हणून इस्लाममध्ये समजला जातो.

    यात पुरूषाने निकाह केलेल्या महिलेला घटस्फोट देताना एकदा तलाक म्हटल्यावर पुढचा एक महिना म्हणजे एक चांद्रमास थांबणे अनिवार्य आहे. असे तीन महिने ही प्रक्रिया होऊन दरम्यानच्या काळात एकत्र राहण्यावर दोघांची सहमती न झाल्यास अंतिम निर्णय म्हणून तलाक घेतला जातो आणि यामध्ये निकाहच्या वेळी पतीने मान्य केलेली महिलेच्या मेहेरची रक्कम तिचा सन्मान राखून तिला परत देण्याचा प्रघात आहे.

    इस्लाम धर्मात मुस्लिम महिलांनाही निकाह त्यांच्या दृष्टीने प्रभावी राहीला नाही असे वाटले तर, खुला पद्धतीचा उपयोग करून घटस्फोट घेता येतो आणि या पद्धतीत तिला निकाहच्या वेळी मिळालेली मेहेर ती पतीला परत करते. भारतामध्ये एकाच वेळी तीन वेळा तलाक म्हणून महिलांना ताबडतोब घटस्फोट देण्याची पद्धत अनेक वर्षे चालू असली तरी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधुनिक काळात या तलाक देण्याच्या पद्धतीतही बदल झालेले दिसतात.

    जसे कागदाच्या तुकड्यावर लिहून, फोनवरून, मोबाईल फोनवरून, एसएमएसद्वारे तलाक देणे, मेल पाठवून अथवा व्हॉट्सअपवरून मेसेज करून तलाक देता येत होता. र्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशाला ग्राह्य मानून केंद्र सरकारने मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पावले उचलली आणि राज्यसभेत दोन वेळा डावलले गेलेल्या तिहेरी तलाक विधेयक मोदी सरकारने २०१९ मध्ये हे विधेयक मांडले होते. त्याला मंजुरीही मिळाली होती.

    Crime registered in Triple Divorce Act: Divorced wife over phone from Saudi Arabia

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!