वृत्तसंस्था
हैदराबाद : कोरोनाविरोधी कोव्हक्सींन लस भारतात विकसित झाल्यामुळे अनेकांना पोटशूळ झाले आहे.अकारण तक्रारीचा पाढा वाचला लोकांनी त्यावर टीका केली, असे भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सांगितले.Covacin vaccine production in India has led to many complaints ; Chief Justice N. V. Ramana
हैदराबाद येथे गुरुवारी रामेनीनी फाउंडेशनच्या कार्यक्रमात ते बोलत होते.भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी भारत बायोटेकचे एमडी डॉ कृष्णा एम. एला आणि जॉइंट एमडी सुचित्रा एम. एला यांचे औषध विज्ञानाच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक केले.
भारत बायोटेकला अमेरिकेच्या रामेनेनी फाऊंडेशनकडून 2021 चा विशिष्ट पुरस्कार मिळाला.ज्यात भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. “मला लसींबद्दल एक गोष्ट सांगायची आहे.
विविध अभ्यास सांगतात की कोव्हक्सीन प्रभावी असून कोरोनाच्या नवीन प्रकारांवर देखील काम करते. पण अनेकांनी त्यावर टीका केली. कारण ती भारतात बनलेली आहे.”
काहींनी लसीविरोधात जागतिक आरोग्य संघटनेकडे तक्रारही केली.
फायझर सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतीय लसीच्या विरोधात काम केले. देशातील अनेकांनीही या लसीची जागतिक मान्यता मिळू नये, यासाठी प्रयत्न केला.
हैदराबादी व्यक्तीने कोव्हक्सीन लस केली. त्यामुळे तेलुगुचे मोठेपण अधोरेखित करण्याची गरज आहे.
तसेच एका तेलुगू माणसाने जगातील दुसऱ्या तेलुगू माणसाला प्रोत्साहन दिले पाहिजे. आपल्यात एकता हवी… हे तुम्ही लक्षात ठेवावे. आपल्या तेलगू भाषा आणि संस्कृतीच्या महानतेचा प्रचार केला पाहिजे,” असे सरन्यायाधीश रमणा म्हणाले.
Covacin vaccine production in India has led to many complaints ; Chief Justice N. V. Ramana
- लाईफ स्किल्स : यशासाठीचे पंतसूत्रे लक्षात ठेवा
- कर्जबुडव्या नीरव मोदीच्या १,००० कोटींच्या मालमत्तांमधील रिदम हाऊसचा होणार लिलाव, ईडी केले होते सीज
- मुंबई : दादर परिसरातल्या डॉ. लाल पॅथलॅबमधील १२ कर्मचारी आढळले कोरोना पॉझिटिव्ह ; महापालिकेने लॅब केली सील
- गोव्यात पक्षविस्ताराचे स्वप्न पाहणाऱ्या ममतांना मोठा धक्का, तृणमूलच्या पाच सदस्यांचा राजीनामा; जनतेत फूट पाडत असल्याचा केला आरोप