वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशामध्ये १ ऑगस्टपर्यंत १० लाख किंवा त्याहून अधिक लोकांचा कोरोनाने बळी जाण्याची शक्यता असल्याचे इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशनने (आयएचएमई) म्हटले आहे. Corona will spread rapidly in India. In August death count will be 10 lakhs
इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन (आयएचएमई) ही संस्था आरोग्य क्षेत्रातील घडामोडींवर संशोधन करणारी ही जागतिक दर्जाची आहे.
तिने केलेल्या भाकिताचा हवाला देत लॅन्सेट नियतकालिकाने म्हटले आहे की, कोरोनावर प्रारंभीच्या काळात भारताने यश मिळविले. नंतर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या कृती गटाची त्यामुळे एप्रिलपर्यंत बैठकच झाली नव्हती.
लॅन्सेटच्या संपादकीय म्हटले आहे की, मोदी सरकारने झालेल्या चुका मान्य कराव्यात. पारदर्शकपणे धोरणे राबविली पाहिजे. सध्याच्या लसीकरण मोहिमेतील सर्व त्रुटी भारताने दूर करून मोहिमेचा वेग वाढवावा.
धार्मिक कार्यक्रमांमुळे संसर्ग ?
धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाने कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, असे इशारे दिले होते. परंतु सरकारने दुर्लक्ष केले. कार्यक्रम, जाहीर सभांमध्ये लाखो लोक उपस्थित राहिले. त्यामुळे संसर्ग प्रचंड फैलावला.
टीकेला भीक घातली नाही
भारत सामूहिक प्रतिकारशक्तीच्या जवळ आला आहे असे काही जण सांगत होते; पण त्यात काही तथ्य नाही. टीकेबाबत गंभीरपणे विचार केला नाही. कोरोना साथ कशी नियंत्रणात आणली याचाच गवगवा करण्यात आला.
Corona will spread rapidly in India. In August death count will be 10 lakhs
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांनी पाळले आश्वासन, पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ
- पश्चिम बंगालमध्ये अराजकता, पुढील काही दिवसांत नरक बनेल राज्य, माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी व्यक्त केली भीती
- मुंबईच्या कोरोना मॉडेलमागे काळंबेरं, आकडेवारी उजेडात येऊ दिली जात नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप