• Download App
    महाराष्ट्रासह पाच राज्यांना कोरोनाचा विळखा ; वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत अधिकच भर। Corona to five states including Maharashtra; The growing number of patients has added to the anxiety

    महाराष्ट्रासह पाच राज्यांना कोरोनाचा विळखा ; वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत अधिकच भर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात स्थिती गंभीर बनत चालली आहे. पाच राज्यांत तर कोरोनाचा विळखा घट्ट झाला. मंगळवारी उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. Corona to five states including Maharashtra; The growing number of patients has added to the anxiety



    महाराष्ट्र बनला कोरोनाचा हॉटस्पॉट

    महाराष्ट्र देशातील कोरोना हॉटस्पॉट बनला आहे. मंगळवारी रुग्णांच्या संख्येत 60 हजाराहून अधिक भर पडली. दरम्यान, संक्रमण रोखण्यासाठी आज रात्री आठ वाजल्यापासून राज्यात 15 दिवसांचा कडक कर्फ्यू जाहीर केला आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसण्यास मदत मिळणार आहे.

    उत्तर प्रदेश

    सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशात मंगळवारी18 हजार रुग्णांची नोंद झाली. 85 रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण 7 लाख लोक संक्रमित झाले. तर 9,309 लोकांचा मृत्यू झाला. काल लखनऊमध्ये सर्वाधिक 5382 रुग्ण आढळले तर अलाहाबादमध्ये 1856, वाराणसीमध्ये 1404 आणि कानपूरमध्ये 1271 नवीन रुग्ण आढळले.

    गुजरात

    गुजरातमध्ये काल 6699 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. संक्रमित लोकांची संख्या 360206 वर आहे. काल 67 लोकांचा मृत्यू झाला। एकूण मृतांची संख्या 47922 वर पोचली आहे. रात्रीच्या जमावबंदसह अनेक जिल्ह्यांत निर्बंध लागू केले आहेत.

    मध्य प्रदेश

    काल मध्यप्रदेशात 8998 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 4261 जण दगावले आहेत. सध्या र अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 43539 आहे.

    दिल्ली
    दिल्लीतही काल 13 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत रात्रीची जमावबंदीसोबतच चाचण्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

    Corona to five states including Maharashtra; The growing number of patients has added to the anxiety

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!