विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रतापगडच्या शुक्लापूर ग्रामस्थांनी चक्क कोरोना माता मंदिराची उभारणी केली. तेथे कोरोना देवीची प्रतिमा साकारली असून तेथे पूजा पाठही सुरू झाले आहेत. या मंदिरात केवळ पूजाच नाही तर कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याबाबतही सूचना दिल्या जात आहेत.Corona temple build in UP
या मंदिराची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा त्या ठिकाणी पूजेसाठी लोकांची संख्या वाढू लागली. मंदिराच्या परिसरात मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना मातेला पिवळे फूल वाहावे, दर्शनापूर्वी मास्क घालावा, हात पाय धुणे, सेल्फी घेताना मूर्तीला स्पर्श करू नये आदी सूचनांचा उल्लेख करण्यात आला आहे. मंदिरासाठी गावकऱ्यांनी देणगी दिली आणि त्यातून मंदिर साकारले आहे.
गेल्या महिन्यातच तमिळनाडूच्या कोइमतूर येथे कोरोना देवीच्या मूर्तीची पूजा केली होती. कामाछीपुरी आदिम मंदिराचे पुजारी म्हणाले की, जीवघेण्या आजारापासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी देवी-देवतांची उपासना करण्याचे कार्य बऱ्याच काळापासून सुरू आहे.
१९०० दशकाच्या प्रारंभी कोइमतूर जिल्ह्यात प्लेगने हाहा:कार माजविला होता, तेव्हा स्थानिक नागरिकांनी प्लेग मारिअम्मान मंदिरात प्रार्थना केली होती.
Corona temple build in UP
महत्त्वाच्या बातम्या
- HSC Exam 2021 : ज्युनिअर कॉलेजमधील कामगिरी व अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना पास करणार
- Maharashtra Corona Updates : राज्यामध्ये शनिवारी आढळले १०,९६२ नवीन रुग्ण, १४,९१० जणांना डिस्चार्ज; १,५५,४७४ ॲक्टिव्ह रुग्ण
- कोरोनाचा उगम नक्की कोठे, चीन व अमेरिकेत झडू लागल्या पुन्हा वादाच्या फैरी
- लहान मुलांनाही कोरोनाची लस ,इंजेक्शन नसून नेझल स्प्रेद्वारे ; रशियात सप्टेंबरपासून लसीकरण
- Dhananjay Mundhe Controversy : ट्रोल करणाऱ्यांचा घेतला समाचार मी नेमकी कितवी पत्नी आहे हे सत्य लोकांसमोर मांडते,माझ्यावरील बंधने हटवा करुणा मुंडे