Corona outbreak india : देशात मागच्या 24 तासांत 3.19 लाख नवे रुग्ण आढळले. 2,762 जणांचा मृत्यू झाला. तथापि, यात दिलासादायक बाब म्हणजे तब्बल 2.48 लाख रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा हा आतापर्यंतचा मोठा आकडा आहे. देशातील सध्याच्या सक्रिय रुग्णसंख्येतही कमी वाढ झाली आहे. काल एका दिवसात सक्रिय रुग्णसंख्येत केवळ 67,660 ची वाढ झाली होती. ही वाढ मागच्या 14 दिवसांतील सर्वात कमी आहे. यापूर्वी 12 एप्रिल रोजी उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत 63,065 ची वाढ झाली होती. Corona outbreak india todays corona cases records low live updates
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात मागच्या 24 तासांत 3.19 लाख नवे रुग्ण आढळले. 2,762 जणांचा मृत्यू झाला. तथापि, यात दिलासादायक बाब म्हणजे तब्बल 2.48 लाख रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा हा आतापर्यंतचा मोठा आकडा आहे. देशातील सध्याच्या सक्रिय रुग्णसंख्येतही कमी वाढ झाली आहे. काल एका दिवसात सक्रिय रुग्णसंख्येत केवळ 67,660 ची वाढ झाली होती. ही वाढ मागच्या 14 दिवसांतील सर्वात कमी आहे. यापूर्वी 12 एप्रिल रोजी उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत 63,065 ची वाढ झाली होती.
देशातील कोरोनाची सद्य:स्थिती
- मागच्या 24 तासांत एकूण नवे रुग्ण : 3.19 लाख\
- मागच्या 24 तासांतील एकूण मृत्यू : 2,762
- मागच्या 24 तासांत बरे झालेले : 2.48 लाख
- आतपर्यंत एकूण संसर्ग झालेले : 1.76 कोटी
- आतापर्यंत ठीक झालेले : 1.45 कोटी
- आतापर्यंत एकूण मृत्यू : 1.97 लाख
- सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : 28.75 लाख
कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट येण्याचे कारण महाराष्ट्र आणि दिल्लीत झालेल्या कमी रुग्णसंख्येची नोंद हे आहे. दोन्ही राज्यांत काल कमी रुग्ण आढळले. महाराष्ट्रात सोमवारी 48,700 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 71,736 जण बरे झाले. राज्यात या काळात 524 मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत राज्यात 43 लाख 43 हजार जणांना संसर्ग झाला आहे. यापैकी 36.01 लाख जण बरे झालेले आहेत. तर 65 हजार 284 जणांचा मृत्यू झाला आहे. 6 लाख 74 हजार 770 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दिल्लीतही 20 हजारांच्याजवळ रुग्णांची नोंद झाली. येथेही दररोज सरासरी 25 हजारांहून जास्त रुग्णांची नोंद होत होती.
भारतासाठी जगभरातून मदतीचे हात
देशात कोरोनाच्या उद्रेकामुळे आरोग्य यंत्रणेवर सर्वात मोठा ताण आला आहे. बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सर्वांच्या तुटवड्याच्या तक्रारी देशभरातून येत आहेत. दिल्ली, यूपी, महाराष्ट्र, मध्य प्रदेश प्रत्येक ठिकाणी एकसारखी परिस्थिती आहे. अशा संकटाच्या काळात जगभरातून भारताच्या मदतीसाठी अनेक राष्ट्रांनी पुढाकार घेतला आहे. अमेरिकेतर्फे नुकतीच भारताला मदत पोहोचवण्यात आली. पीएम मोदी आणि जो बायडेन यांच्यात चर्चा झाली. अमेरिकेशिवाय यूके, सौदी अरब, हाँगकाँगसहित अनेक देशांनी आपल्याकडून मदत पाठवली आहे. अनेक देशांनी ऑक्सिजन पुरवठ्याशी संबंधित उपकरणे पाठवली आहेत.
Corona outbreak india todays corona cases records low live updates
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मेक द डिफरंस’ : प्रमोद सावंत म्हणजे पर्रिकरांचा ‘ लंबी रेस का घोड़ा’ …गोव्याचे डॉक्टर जेव्हा मुख्यमंत्री होतात आणि मुख्यमंत्री जेव्हा डॉक्टर होतात !
- आमने-सामने : आदित्य-मलिक-थोरात यांच्यात श्रेयाची स्पर्धा ; कोरोनाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रात मोफत लसीकरणावरून आघाडीत ‘विस्फोट’ ; आदित्यचे ट्विट-डिलीट
- अडीच लाख उत्तर भारतीयांचा पुण्याला बायबाय, रेल्वेने रवाना; कोरोना, लॉकडाऊनचा परिणाम्र
- कर्नाटकामध्ये कोरोनामुळे आजअखेर १४ हजारांवर बळी ; १३ लाख जण बाधित
- केंद्रीय दलांच्या तुकड्यांवर अजूनही ममतांचा खार कायम, जवानांना परत बोलावण्याची मागणी