• Download App
    संसद भवनामध्ये कोरोनाचा उद्रेक ; तब्बल ७१८ कर्मचारी लागण; अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे संकट|Corona eruption in Parliament building; 718 employees infected; Corona crisis over budget session

    संसद भवनामध्ये कोरोनाचा उद्रेक ; तब्बल ७१८ कर्मचारी लागण; अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे संकट

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : संसद भवनातील ७१८ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे संसद भवनात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे उघड होत असून अर्थसंकल्पीय अधिवेशनवर देखील संसर्गाचे संकट घोंगावत आहे.
    Corona eruption in Parliament building; 718 employees infected; Corona crisis over budget session

    संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यास काही दिवस उरलेले आहेत. अशात संसद भवनातील शेकडो कर्मचाऱ्यांना कोरोनाचा फटका बसला. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. तिसऱ्या लाटेत गेल्या महिन्यात ७१८ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यापैकी बहुतेकांना दोन आठवड्यांत संसर्ग झाला आहे.



    ९ जानेवारीपर्यंत सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना लागण झाली होती. मात्र बुधवारी हा आकडा ७०० च्या पुढे गेला. गेल्या तीन दिवसांत या आकडेवारीत तब्बल ४३ टक्क्यांनी वाढ झाली. दुसरीकडे अनेक दिग्गज केंद्रीय मंत्री यांना कोरोना झाला आहे.

    वृत्तानुसार, सुमारे २०० कर्मचारी राज्यसभेतील असून उर्वरित लोकसभेसह अन्य विभागांशी संबंधित आहेत. दरम्यान, लोकसभा आणि राज्यसभेने त्यांच्या एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना तर ५० टक्के अधिकाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे.

    Corona eruption in Parliament building; 718 employees infected; Corona crisis over budget session

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार