Controversy over hijab in Karnataka : उडुपी येथील शाळेपासून सुरू झालेला हिजाबचा वाद संपूर्ण कर्नाटकात पसरला आहे. या प्रकरणाबाबत मुलींनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे की, इस्लाममध्ये हिजाब अनिवार्य आहे, त्यामुळे त्यांना परवानगी देण्यात यावी. त्याचवेळी हुबळी येथील श्रीराम सेनेचे प्रमोद मुथालिक यांनी म्हटले आहे की, तुम्ही भारताला पाकिस्तान बनवत आहात की अफगाणिस्तान? जर तुम्ही बुरखा किंवा हिजाब घालण्यास सांगत असाल तर तुम्ही पाकिस्तानात जाऊ शकता. Controversy over hijab in Karnataka Shri Ram Sena chief says if you want to wear burqa or hijab, go to Pakistan, hearing in High Court on February 8
वृत्तसंस्था
बंगळुरू : उडुपी येथील शाळेपासून सुरू झालेला हिजाबचा वाद संपूर्ण कर्नाटकात पसरला आहे. या प्रकरणाबाबत मुलींनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे की, इस्लाममध्ये हिजाब अनिवार्य आहे, त्यामुळे त्यांना परवानगी देण्यात यावी. त्याचवेळी हुबळी येथील श्रीराम सेनेचे प्रमोद मुथालिक यांनी म्हटले आहे की, तुम्ही भारताला पाकिस्तान बनवत आहात की अफगाणिस्तान? जर तुम्ही बुरखा किंवा हिजाब घालण्यास सांगत असाल तर तुम्ही पाकिस्तानात जाऊ शकता.
याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालय मुस्लिम विद्यार्थ्यांच्या याचिकेवर ८ फेब्रुवारीला सुनावणी करणार आहे. न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांच्या खंडपीठाने गुरुवारी हा आदेश दिला.
असे आहे प्रकरण
कर्नाटकात हिजाबचा वाद जानेवारी 2022 मध्ये सुरू झाला. उडुपी येथील प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजने हिजाब परिधान केल्याबद्दल 7 मुलींना वर्गात जाण्यास मनाई केली. यानंतर या मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आंदोलन सुरू केले होते की, हिजाब घालण्याची परवानगी न देणे हे संविधानाच्या कलम 14 आणि 25 अंतर्गत त्यांच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे.
मात्र, उडुपीचे आमदार आणि महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष के. रघुपती भट यांनी हिजाब परिधान केल्याबद्दल आंदोलक विद्यार्थ्यांशी झालेल्या बैठकीनंतर शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार मुस्लिम विद्यार्थ्यांना हिजाब परिधान करून वर्गात प्रवेश दिला जाणार नसल्याचे सांगितले होते.
हिजाबला विरोध म्हणून विद्यार्थ्यांनी परिधान केले भगवे
जानेवारीमध्ये कॅम्पसमध्ये मुलींनी हिजाब परिधान केल्याचा निषेध नोंदवण्यासाठी चिकमंगळूरच्या काही विद्यार्थ्यांनी भगवी शाल परिधान करण्यास सुरुवात केली. हे प्रकरण आता राज्यभर गाजले आहे. मंगळवारीही अनेक विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. हा ‘हिजाब विरुद्ध भगवा गमछा’ हा आतापर्यंत हुबळी, उडुपी, कुंदापूर येथील शाळा-महाविद्यालयांमध्ये विरोध झाला आहे. जिथे विद्यार्थी हिजाबच्या निषेधार्थ भगवी शाल किंवा गमछे घालून कॅम्पसमध्ये येत आहेत.
Controversy over hijab in Karnataka Shri Ram Sena chief says if you want to wear burqa or hijab, go to Pakistan, hearing in High Court on February 8
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : ISISच्या अबू इब्राहिम अल-हाशिमीचा अमेरिकन सैन्याकडून खात्मा, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लाइव्ह पाहिली मोहीम
- मोठी बातमी : असदुद्दीन ओवैसींच्या कारवर गोळीबार, मेरठहून परतत असताना कारवर 4 राऊंड फायर करून पळून गेले हल्लेखोर
- Budget Session : मराठीला लवकरच मिळणार अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती
- गेल्या सात वर्षात चीनमधून आयात वाढली पियूष गोयल यांची लोकसभेत माहि
- एटीएसने अपहरण केले; हिंदुत्ववाद्यांविरुध्द दबाव आणला मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आणखी एक साक्षीदार उलटला