वृत्तसंस्था
बंगळूरू : कर्नाटकात हिजाबनंतर आता बायबलवरून वाद सुरू झाला आहे. बंगळुरूच्या क्लेरेन्स हायस्कूल व्यवस्थापनाने मुलांना शाळेत बायबल आणणे बंधनकारक केले आहे. या निर्णयाला हिंदू संघटनांनी विरोध सुरू केला आहे. Controversy over Bible after hijab in Karnataka: Bible binding at school; Opposition to Hindu organization
बंगळुरूमधील क्लेरेन्स हायस्कूल प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या पालकांकडून एका अर्जावर हमी घेतली आहे की ते त्यांच्या मुलांना बायबल शाळेत आणण्यास हरकत घेणार नाहीत.
हिंदू संघटनांनी शाळेचा हा निर्णय म्हणजे शिक्षण कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. या वादावर शाळेने म्हटले आहे की, मुलांना पवित्र ग्रंथातील चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. दरम्यान ,हिंदू जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते मोहन गौडा यांनी दावा केला की, शाळांमध्ये ख्रिश्चन नसलेले विद्यार्थीदेखील आहेत ज्यांना बायबल वाचण्यास भाग पाडले जाते.
Controversy over Bible after hijab in Karnataka: Bible binding at school; Opposition to Hindu organization
महत्त्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ महिलेला पाठीवर घेऊन कच्छच्या वाळवंटात महिला पोलिस हवालदाराची पाच किलोमीटर पायपीट
- पंजाबमध्ये गव्हाच्या कमी उत्पादनामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; १७ लाखांचे होते कर्ज
- मुंबई पालिकेसाठी लागलीये सगळी “बेट”; मुख्यमंत्र्यांची सहकुटुंब “फायर आजी”ची भेट!!
- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची भाजपची मागणी नाही, पण ही तर जनभावना!!; देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य