वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केंद्रातील मोदी सरकारवर तोंडसुख घेताना बऱ्याच घसरल्या आहेत. या घसरण्यातूनच त्यांनी स्वतःची तुलना मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरशी केली आहे.control Twitter that’s why they want to bulldoze them. Similarly, why they are trying to bulldoze my government. They should stop this: West Bengal CM Mamata banerjee
केंद्र सरकारला ट्विटरला रोखता येत नाही म्हणून त्यावर बंदी आणायची किंबहुना त्याला जमीनदोस्त (bulldoze ) करायचे आहे. तसेच मला देखील केंद्र सरकार रोखू शकत नाही, म्हणून माझे पश्चिम बंगालमधील सरकार त्यांना जमीनदोस्त (bulldoze ) करायचे आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. केंद्र सरकारने असले प्रकार थांबवावेत. त्यांना ते जमणार नाही, अशी टिपण्णीही त्यांनी केली.
केंद्र सरकारने लागू केलेला नवा माहिती तंत्रज्ञान कायदा ट्विटर पाळत नाही. त्यामुळे केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यात वाद सुरू आहे. भारतातले नवे कायदे पाळत असल्याचा ट्विटरचा दावा आहे. पण केंद्र सरकारने तो मान्य केलेला नाही. या पार्श्वभूमीवर रविशंकर प्रसाद यांनी केंद्र सरकारची भूमिका मांडत ट्विटरची लडाखच्या मुद्द्यावरून आणि शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून पोलखोल केली आहे.
त्यानंतर ममता बॅनर्जींनी स्वतःची तुलना ट्विटरशी केली आहे. याला राजकीय महत्त्व आहे. यास चक्रीवादळानंतर केंद्र सरकारने बंगाल सरकारला एक पैसाही दिलेला नाही, असा आरोप देखील ममतांनी केला. यास चक्रीवादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालचा दौरा केला होता. पण त्यावेळी पंतप्रधानांच्या बैठकीस उपस्थित न राहता त्यांना नुसते निवेदन देऊन ममता बॅनर्जी दुसऱ्या ठिकाणी दौऱ्यावर निघून गेल्या होत्या.
control Twitter that’s why they want to bulldoze them. Similarly, why they are trying to bulldoze my government. They should stop this: West Bengal CM Mamata banerjee
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेसला स्वबळाच्या मरणाने मरू देत एकत्र लढण्याचा शिवसेना- राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन
- डॉक्टरांचे हात पाय बांधून लोणावळ्यात ७० लाखांचा दरोडा, शस्त्राच्या धाकाने दरोडेखोरांनी अर्धा तास ठेवले ओलिस
- कोणाच्या जोरावर छाती फुगवता, तुमचा उध्दव आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आलाय, नितेश राणे यांचा हल्लाबोल
- भाजपमधून तृणमूळमध्ये गेलेल्या मुकूल रॉय यांची केंद्रीय सुरक्षा काढली… पण का…?? केव्हा…?? आणि कशी…??
- 12th RESULT : CBSE 12वीचा निकाल 31 जुलैला ; असा असणार बारावी बोर्डाच्या निकालाचा 303040 फॉर्म्युला ; सर्वोच्च न्यायालयात मूल्यांकन निकष सादर