वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंजाबमध्ये काँग्रेसवर बहुजन समाज पक्ष आणि कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी जी टीका केली आहे ती खरी असल्याची बाब काँग्रेसनेच सिद्ध केली आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या रूपात दलित मुख्यमंत्री ही “तात्पुरती राजकीय व्यवस्था” आहे. कारण पंजाब मध्ये काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार नाही तर सामुदायिक नेतृत्वाखाली निवडणूक लढवतील असे पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. Congress will not declare anyone as the chief minister’s face in Punjab
मुख्यमंत्रीपदावरून कॅप्टन अमरिंदरसिंग यांना घालवल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्रीपदाची आस होती. परंतु काँग्रेस हायकमांडने त्यांच्या इच्छेवर देखील पाणी फिरवले. चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवून पंजाब मध्ये पहिला दलित मुख्यमंत्री बनविल्याबद्दल मोठी राजकीय जाहिरातबाजी केली. त्यावेळी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी काँग्रेसवर टीका केली होती.
काँग्रेसला कायमचा दलित मुख्यमंत्री नेमायचा नाही. त्यांना “तात्पुरती राजकीय व्यवस्था” म्हणून दलित मुख्यमंत्री नेमून फक्त दलितांची मते मिळवायची आहेत. निवडणुकीनंतर काँग्रेस दलित मुख्यमंत्री नेमणार नाही, असे टीकास्त्र मायावती यांनी सोडले होते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देखील त्याच पद्धतीची टीका केली होती.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आजच्या घोषणेकङे बघण्यात येत आहे. काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणार नाही. तर पंजाब मध्ये काँग्रेस सामुदायिक नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल, असे पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. यातून काँग्रेस विषयीचा वेगळा सामाजिक संदेश राज्यांमध्ये गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचे पडसाद पंजाबच्या निवडणुकीत उमटणार आहेत.
Congress will not declare anyone as the chief minister’s face in Punjab
महत्त्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये येताय, दारूबंदी पाळावीच लागणार, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले स्पष्ट
- अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांसामोर जोडले हात ; म्हणाले – दादा , मास्क लावा !
- ओमायक्रॉनबाबत आयआयटी कानपूरच्या संशोधकांचा थरकाप उडविणारा अंदाज, कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीच्या प्रारंभी गाठणार कळस
- मिग २१ लढाऊ विमान जैसलमेरमध्ये कोसळले ; दुर्घटनेत विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृत्यू