विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मेघालयातील काँग्रेसच्या १७ पैकी १२ आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला दिलेला हा मोठा धक्का आहे . राष्ट्रात आपला जम बसवण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसने अनेकांना पक्षात सामिल करून घेतले आहे त्यापैकी जास्तीत जास्त कॉंग्रेसचे नेते आहेत.यापैकी एक मुकुल संगमा यांनी प्रशांत किशोर हेच कॉंग्रेसचे आमदार फोडत असल्याचे स्पष्ट केले आहे. CONGRESS VS TMC: Break and rule! Prashant Kishor after firing ‘they’ 12 Congress MLAs in Trinamool! This is what the Congress did
संगमा यांच्या खुलास्यामुळे मेघालय काँग्रेसला सुरुंग लावणारे प्रशांत किशोरचं असल्याचं स्पष्ट झालंय. तृणमूलमध्ये प्रवेश केलेल्या १२ आमदारांच्या गटाचे नेतृत्व करणाऱ्या मुकुल संगमा यांनी काँग्रेस सोडण्याच्या प्रक्रियेची सुरुवात प्रशांत किशोर यांच्यासोबत कोलकात्यात झालेल्या भेटीनंतर झाली होती असा धक्कादायक खुलासा केलाय. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने व्हिन्सेंट पाला यांची मेघालय प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केल्यानंतर या घडामोडी घडल्याचं देखील संगमा यांनी सांगितलं.
‘लोकशाहीमध्ये समतोल असायला हवा. त्यासाठी खंबीर विरोधी पक्षाची गरज आहे. आम्ही ही बाब दिल्लीतील नेतृत्वापर्यंत पोहचवली, अनेकदा दिल्लीच्या वाऱ्या केल्या मात्र काहीही घडलं नाही. प्रबळ विरोधी पक्षासाठी पर्याय शोधाताना मी माझे मित्र प्रशांत किशोर यांना कोलकात्यात भेटलो. यावेळी झालेल्या चर्चेत जनहित इतर कशाही पेक्षा श्रेष्ठ असल्यावर आमचं एकमत झालं.’ असं सांगत संगमा यांनी तृणमूल प्रवेशामागील किशोर यांची महत्वपूर्ण भूमिका असल्याचं स्पष्ट केलं.
प्रशांत किशोर यांनी एप्रिल-मे महिन्यात झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांचे निवडणूक सल्लागार म्हणून काम केलेआहे. राज्यात भाजपने सत्ताधारी तृणमूलला सुरुंग लावत पक्षातील मोठे नेते आपल्या गटात सामील करून घेतले होते. पक्षाला गळती लागलेली असताना देखील ममता यांनी एकहाती लढा देत बहुमत प्राप्त केले. बॅनर्जी यांच्या विजयात निवडणूक रणनीतीकर प्रशांत किशोर यांचे योगदान देखील महत्वपूर्ण आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचं आव्हान मोडीत काढल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आता आपला मोर्चा राष्ट्रीय राजकारणाकडे वळवला आहे. २०२३ त्रिपुरा विधानसभा निवडणुकांसाठी तृणमूलने जोरदार तयारी तयारी सुरु केली आहे. अशातच आता मेघालयात काँग्रेसला दिलेल्या धक्क्यामुळे बॅनर्जीं ईशान्येकडील सर्वच राज्य काबीज करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. तृणमूलची आगेकूच ही काँग्रेसला सुरुंग लावूनच होत असल्याचं पाहायला मिळतंय. गोवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लुइझिन्हो फालेरो, हरियाणात राहुल गांधींचे माजी सहकारी अशोक तंवर आणि बिहारमध्ये जनता दल युनायटेडचे माजी नेते पवन वर्मा ही तृणमूलमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची नावे आहेत.
CONGRESS VS TMC : Break and rule! Prashant Kishor after firing ‘they’ 12 Congress MLAs in Trinamool! This is what the Congress did
महत्त्वाच्या बातम्या
- मतांनी नव्हे तर लष्कराच्या पाठिंब्याने इम्रान खान सत्तेवर, नवाझ शरीफ यांना भ्रष्टाराचाच्या जाळ्यात अडकविण्याचाही कट
- WATCH : वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हिंगोलीत साकारतेय घनदाट जंगल
- सुप्रिम कोर्ट आदेश पाळत परमबीर सिंहांचे चौकशीत सहकार्य; साडेसहा तास चौकशीत सर्व आरोप फेटाळले!
- भाजप – काँग्रेस यांचे ठरल्यानुसार विधान परिषद निवडणूक बिनविरोध