विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकेकाळची सत्ताधारी कॉँग्रेस देशातून नामशेष होत चालली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. गेल्या साठ वर्षांच्या निवडणूक इतिहासात ही पहिलीच वेळ आहे.Congress take report of defeat online
या पराभवाचे आत्मचिंतन करण्यासाठी कॉँग्रेसने समितीही नेमली. मात्र, विनोद म्हणजे या समितीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून पराभवाची कारणमिंमासा शोधली. उंटावरून शेळ्या राखण्याचाच प्रकार केला.
एप्रिल-मे महिन्यात ५ विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. या निवडणुकांमध्ये काँग्रेस सपाटून पराभव झाला. इतका की पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही.
यावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यांची एक समिती नेमली होती. या समितीने आपला रिपोर्ट सोनिया गांधींकडे सोपवला आहे.
सोनिया गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या कारणांचा छडा लावण्यासाठी गेल्या ११ मे रोजी ही समिती नेमली होती. या समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता.
नंतर आणखी एक आठवडा वाढवून देण्यात आला. या समितीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद, मनीष तिवारी, विंसेट पाला आणि लोकसभेतील पक्षाचे खासदार ज्योती मणी यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे या समितीने पाच राज्यांत भेट दिली नाही. समितीचे सदस्य एकमेंकांना भेटलेही नाहीत. तर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीतील नेत्यांसोबत बैठक घेतली.
समितीने संबंधि राज्यांचे प्रभारी आणि प्रदेश संघटनेतील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यासोबत चर्चा करून प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि कारणांची माहिती घेतली.
आसाम आणि केरळमध्ये सत्तेत येण्याचा प्रयत्न करणाºया काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत खातंही उघडता आलं नाही. पुदुच्चेरीतही पक्षाचा सपाटून पराभव झाला.
कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी होती की पक्षाच्या नेतृत्वाने किमान त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. नेत्यांनी येऊन त्यांना सहानुभूती दाखवावी. पुढील काळात काय करता येईल याचा आराखडा करावा. मात्र, आत्मचिंतनही उरकल्याप्रमाणे कॉँग्रेसच्या नेत्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काय चर्चा केली माहित नाही पण आपला अहवाल दिला आहे.
Congress take report of defeat online
महत्त्वाच्या बातम्या
- बाबा रामदेव यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी, न्यायालयात याचिका दाखल
- लसीच नाहीत तर मग वाजतगाजत का उघडली लसीकरण केंद्रे, केजरीवाल सरकारला हायकोर्टाने फटकारले
- मेहुल चोकसीला भारतात आणण्यासाठी डोमिनिकामध्ये आहेत सीबीआयच्या या डॅशिंग महिला अधिकारी
- राहुल गांधींनी एका दिवसात ट्विटरवरून अनेक नेत्यांना – पत्रकारांना केले अनफॉलो
- Corona Vaccines : फायझर आणि मॉडर्नासारख्या परदेशी लसींना भारतात प्रवेशाचा मार्ग मोकळा, ट्रायलची गरज नाही