वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार तथा खासदार शशी थरूर यांनी पक्षनेत्यांच्या दुटप्पीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘प्रदेश काँग्रेस समितीच्या (पीसीसी) अध्यक्षांसह सर्वच मोठे नेते माझ्या प्रचारावेळी गायब राहतात. पण मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचारावेळी ते आवर्जुन उपस्थित राहतात,’ असे ते गुरूवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.Congress presidential candidate Shashi Tharoor’s trouble PCC president will also meet, all round
थरुर म्हणाले की, ‘पक्षाचे नेते खरगेंच्यावतीने नागरिकांना निमंत्रित करतात. त्यांना उपस्थित राहण्याची सूचना करतात. हे सर्व एका उमेदवारासाठी (मल्लिकार्जुन खरगे) होते. माझ्यासाठी असे केव्हाच होत नाही. मी राज्य काँग्रेस समितींचा दौरा केला. पण तिथे प्रदेशाध्यक्ष उपस्थित नव्हते. मी तक्रार करत नाही. पण तुम्हाला या व्यवहारातील फरक दिसत नाही?’
निवडणुकीशी संबंधित दस्तावेज न मिळण्याचाही आरोप
थरुर एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर निवडणुकीशी संबंधित दस्तावेज न देण्याचाही आरोप केला. ते म्हणाले की, ‘मला सोमवारी म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या काँग्रेस प्रतिनिधींची एक अर्धवट यादी मिळाली आहे.
पण त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी यादीत कुणाचाही क्रमांक देण्यात आला नाही. मला दोन याद्या मिळाल्या. पहिल्या यादीत फोन क्रमांक नव्हते. त्यामुळे मला पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या डेलिगेट्सशी कसा संपर्क साधता येईल?’ असे ते म्हणाले. हे सर्वकाही जाणिवपूर्वक होत असल्याचा इशारा त्यांनी केला. ‘पक्षात 22 वर्षांपासून निवडणूक झाली नाही. त्यामुळे ही चूक झाली असेल,’ असे थरुर म्हणाले.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी येत्या 17 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, 19 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यात थरुर किंवा खरगे यापैकी कुणीही जिंकले तरी तब्बल 24 वर्षांनंतर काँग्रेस अध्यक्षपदाच्या खुर्चीत गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती बसणार आहे.
थरूर यांचा पक्षाच्या मोठ्या नेत्यांवर भेदभावाचा आरोप
थरूर यांनी यावेळी आपण पक्षाच्या निवडणूक विभागाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांच्यावर भेदभावाचा आरोप करत नसल्याचेही स्पष्ट केले. मिस्त्री नव्हे तर काँग्रेसचे बडे नेते पक्षपातपीपणा करत असल्याचे ते म्हणाले.
थरूर म्हणाले – ‘मी जेव्हा समान संधी न मिळाल्याचा आरोप करतो तेव्हा ती मिस्त्रींविषयी नसते. हे पक्षाच्या मोठ्या नेत्यांसाठी असते. मी स्वतः दिल्ली काँग्रेसच्या कार्यालयात येऊन मत मागत असल्याचे तुम्ही पाहात आहात. बडे दोन उमेदवारांत असा फरक करत असतील तर हे योग्य कसे असेल? राहुल गांधी यांच्यासारखा मी सुद्धा पक्ष कार्यकर्त्यांना कुणालाही न घाबरता मतदान करण्याचे आवाहन करतो.’
Congress presidential candidate Shashi Tharoor’s trouble PCC president will also meet, all round
महत्वाच्या बातम्या
- इलियासींना वाय प्लस सुरक्षा : जिवे मारण्याच्या आल्या होत्या धमक्या; सरसंघचालकांना राष्ट्रपिता संबोधले होते
- परमबीर सिंहांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट : अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप करून आले होते चर्चेत, चर्चांना उधाण
- मॉस्कोहून येणाऱ्या विमानात बॉम्बची माहिती मिळाल्याने खळबळ : दिल्ली विमानतळावर सुखरूप उतरले प्रवासी
- भुजबळांच्या अमृत महोत्सवी सत्कारात अजितदादांचे भाषण : पवारांचे पंतप्रधानपद, भुजबळांचे मुख्यमंत्रीपद आणि नशीब!!