विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : कर्नाटकातून संपूर्ण देशात निर्माण झालेल्या हिजाब वादाच्या आगीत तेल ओतण्याचा डाव कॉँग्रेसने आखला आहे. यासाठी हिजाबच्या परवानगीसाठी याचिका दाखल केलेल्या याचिकाकर्त्याचे वकील ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांचा कॉँग्रेस कनेक्शन समोर आले आहे.Congress plot to add fuel to fire in hijab controversy
कामत काँग्रेस पक्षातही पदावर आहेत. कामत यांना पुढे करून काँग्रेस या वादाला खतपाणी घालत असल्याची चर्चा आहे. काँग्रेस नेते अॅडव्होकेट देवदत्त कामत हे उत्तर प्रदेश काँग्रेसच्या कायदेशीर समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. 17 जानेवारी 2022 रोजी त्यांची या चार व्यक्तींच्या समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते केसी वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने ही नियुक्ती झालीआहे. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास हे देवदत्त यांचे केवळ फॉलोअर आणि प्रशंसकही आहेत. दोघे मित्रही असून कर्नाटकचे आहेत. अनेकदा देवदत्त आपल्या ट्विटमध्ये श्रीनिवास यांनाही टॅगही करतात.
कर्नाटकात मे 2018 मध्ये काँग्रेसने भाजपवर पक्षाच्या आमदारांना पक्ष बदलण्याचे आमिष दाखवल्याचा आरोप केला होता. या आरोपासोबतच भाजपने त्यांच्या कोणत्याही आमदारांशी संपर्क साधू नये म्हणून काँग्रेसने आमदारांनी भरलेल्या दोन बस बंगळुरूहून एका रिसॉर्टमध्ये पाठवल्या होत्या.
भाजपला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करण्याच्या कर्नाटकच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आणि जेडीएस आघाडीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. 17 मे रोजी रात्री 2 वाजता तीन न्यायाधीशांसमोर ही सुनावणी झाली होती.
काँग्रेसच्या वतीने न्यायमूर्तींसमोर युक्तिवाद देवदत्त कामत करत होते. अॅडव्होकेट कामत हे 2015-2019 दरम्यान कर्नाटकातील काँग्रेसच्या काळात अतिरिक्त महाधिवक्ताही होते. 2019 मध्ये जेव्हा युतीचे सरकार पडले आणि भाजपचे सरकार स्थापन झाले तेव्हा त्यांनी वैयक्तिक कारण सांगून पद सोडले.
Congress plot to add fuel to fire in hijab controversy
महत्त्वाच्या बातम्या
- समाजवादी पार्टी सत्तेत आली तर उत्तर प्रदेशातून देशभरात दहशतवादाचा पुरवठा, अमित शाह यांचा आरोप
- द काश्मीर फाईलवरून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीला जीवे मारण्याच्या धमक्या, वेतागून ट्विटर अकाऊंट केले बंद
- दंगल गर्ल झायराने केला हिजाब बंदीचा निषेध, हिजाब परिधान करणारी स्त्री देवाने तिच्यावर दिलेले दायित्व करते पूर्ण
- बाबा राम रहीमचे 40 लाख अनुयायांना भाजपला मत देण्याचे फर्मान?; आज रात्री होणार कोडवर्ड; “भास्कर”च्या बातमी दावा!!
- मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात गुजरात हायकोर्टात जनहित याचिका; गुजरात सरकारला कोर्टाची नोटीस