• Download App
    कॉँग्रेसची आता ट्विटरकडे मदतीची याचना, जे. पी. नड्डा, स्मृति इराणी, बी.एल. संतोष यांची अकाऊंट बंद करण्याची मागणी |Congress now appeals to Twitter for help,demands to suspend J. P. Nadda, Smriti Irani, B.L.Santosh

    कॉँग्रेसची आता ट्विटरकडे मदतीची याचना, जे. पी. नड्डा, स्मृति इराणी, बी.एल. संतोष यांची अकाऊंट बंद करण्याची मागणी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी टूलकिट बनविण्याचे प्रकरण अंगाशी येऊन सर्व स्तरांतून टीका सुरू झाल्यावर कॉंग्रेसने आता ट्विटरकडे मदतीची याचना केली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृति इराणी, प्रवक्ते संबित पात्रा आणि संघटन मंत्री बी. एल. संतोष यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणी केली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी टूलकिट बनविण्याचे प्रकरण अंगाशी येऊन सर्व स्तरांतून टीका सुरू झाल्यावर कॉंग्रेसने आता ट्विटरकडे मदतीची याचना केली आहे.Congress now appeals to Twitter for help,demands to suspend J. P. Nadda, Smriti Irani, B.L.Santosh

    भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृति इराणी, प्रवक्ते संबित पात्रा आणि संघटन मंत्री बी. एल. संतोष यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणी केली आहे.



    कॉँग्रेसने ट्विटरला याबाबत अधिकृत पत्र लिहिले आहे. भाजपा नेत्यांची टूलकिटच्या आरोपाबाबतची ट्विटस काढून टाकण्याबरोबरच कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी केली आहे.

    कोरोना महासाथ संदर्भात देशात संभ्रम पसरवणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न कोविड-१९ टुलकिटच्या माध्यमातून काँग्रेस करत असल्याचा आरोप मंगळवारी भाजपने केला.

    त्यानंतर काँग्रेस व भाजपविरोधात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. हे टुलकिट भाजपनेच तयार केल्याचा आरोप करत काँग्रेसने भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, बी. एल. संतोष, संबित पात्रा व अन्य नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

    पोलिसांनी भाजपच्या या नेत्यांविरोधात फिर्याद दाखल न केल्यास न्यायालयात दाद मागू असे काँग्रेसचे नेते व वकील अमन पवार यांनी म्हटले आहे.
    या कथित टुलकिट संदर्भात भाजपचे प्रवक्ते व नेते संबित पात्रा म्हणाले होते की,

    कोरोनाच्या महासाथीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीका करण्याची व त्यांची बदनामी करण्याची संधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोडली नाही. कोरोनाचा आढळलेला नवा प्रकार हा मोदी विषाणू असल्याचा प्रचार काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून सुरू आहे.

    त्यात काँग्रेस परदेशी पत्रकारांना हाताशी धरून भारताची बदनामीही करत आहेत. राहुल गांधी सकाळी उठून रोज ट्विट करतात, या ट्विटमधील माहिती या टुलकिटमधील असल्याचाही आरोप पात्रा यांनी केला.

    Congress now appeals to Twitter for help,demands to suspend J. P. Nadda, Smriti Irani, B.L.Santosh

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!