विशेष प्रतिनिधी
अमृतसर : कॉँग्रेसच्या खासदार आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय झाल्याचे वाचून आश्चर्य वाटले ना? पण हे पंजाबमध्ये घडत आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परनित कौर कॉँग्रेसच्या खासदार असूनही भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय आहेत.Congress MP active in campaigning for BJP candidates
पंजाबमध्ये येत्या २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. कॅप्टन अमरिंद सिंग यांनी काही महिन्यांपूर्वीच पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पंजाब लोक काँग्रेस या नावाचा नवा पक्ष स्थापन केला. यानंतर त्यांनी आपल्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक देखील लढवण्याची घोषणा केली. या पक्षाने भाजपासोबत युती केली आहे. आता अमरिंदर सिंग हे भाजपा आणि पंजाब लोक काँग्रेस यांचे संयुक्त उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जरी काँग्रेसचा राजीनामा दिला असला, तरी त्यांच्या पत्नी परनीत कौर या मात्र अजूनही काँग्रेसच्या अधिकृत खासदार आहेत. त्याही पतियाला लोकसभा मतदारसंघातूनच त्या खासदार झालेल्या आहेत. अमरिंद सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर परनीत कौर यांनी स्पष्ट केलेहोते की आपण आपल्या पतीच्या पाठिशी राहणार आहोत. पण हे सांगताना त्यांनी काँग्रेसला मात्र सोडचिठ्ठी दिलेली नाही.
सध्या कॅप्टन अमरिंदर सिंग आपल्या प्रचारासाठी पतियाला विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. परनीत कौर देखील त्यांच्यासोबत त्यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे आपल्याच पक्षाच्या लोकसभा मतदारसंघात परनीत कौर विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्थात त्यांचे पती कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा प्रचार करताना दिसू लागल्या आहेत.
Congress MP active in campaigning for BJP candidates
महत्त्वाच्या बातम्या
- इम्रान खान यांचे तिसरे लग्नही संकटात, माजी पतीला बायको कंत्राटे मिळवून देत असल्याने वाद
- देशातील सर्वात मोठ्या बॅँक फसवणूक प्रकरणात एबीजी शिपयार्डच्या माजी अध्यक्षावर गुन्हा
- HIJAB CONTROVERSY : स्वतला चांगली मुस्लिम सिद्ध करण्यासाठी हिजाब घालण्याची गरज नाही काश्मीरमधील 12वी टॉपरची ऑनलाइन ट्रोलिंगवर धडक प्रतिक्रिया
- मराठा आरक्षणावर उद्या मुंबईत पत्रकार परिषदेत संभाजीराजे भूमिका मांडणार!!