विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात लखीमपूर खीरी हिंसाचार आणि बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेच्या बातमीवर जोरदार चर्चा सुरू असताना देशातले दोन मोठे राजकीय पक्ष मात्र वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहेत. काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रम सुरू आहे आणि भाजपचे सेलिब्रेशन सुरू आहे. Congress movement; Prime Minister’s program; BJP’s celebration !!; Where ?, What ?, What ??
काल दिवसभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी लखीमपुर खीरी इथल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ देशभर विविध शहरांमध्ये आंदोलन करून आपल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला. आज काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष मात्र लखीमपूर हिंसाचारावरून वळून सीतापूरकडे लागले आहे. कारण तेथे काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी सरकारी डाक बंगल्यात स्थानबद्ध आहेत. त्यांच्या सुटकेसाठी काँग्रेस नेत्यांनी सीतापूरमध्ये संपूर्ण उत्तर प्रदेशातून काँग्रेस कार्यकर्ते जमवायला सुरुवात केली आहे. सीतापूर आता पोलिसी छावणीमध्ये रूपांतरित होत आहे.
एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लखीमपूर खीरी वरून वळून सीतापूरकडे लागलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौत एका कार्यक्रमात उपस्थित आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेतून लाभार्थी ठरलेल्या नागरिकांना त्यांच्या निवासाच्या किल्ल्या देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला पंतप्रधानांबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग शहरी विकास मंत्री हरदीप पुरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी नेते उपस्थित आहेत. उत्तर प्रदेशातील 75 जिल्ह्यांमधील 75000 लाभार्थी नागरिकांना पंतप्रधानांच्या हस्ते त्यांच्या घरांच्या किल्ल्या देण्यात येत आहेत.
तर गुजरात मध्ये गांधीनगर महापालिकेत भाजपच्या विजयाची घोडदौड सुरू झाल्याने कार्यकर्ते सेलिब्रेशन करत आहेत. महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीचे पहिले कल भाजपच्या बाजूने लागल्यावर गांधीनगरमध्ये ठिकठिकाणी भाजपच्या नेत्यांनी सेलिब्रेशन सुरू केले आहे.
Congress movement; Prime Minister’s program; BJP’s celebration !!; Where ?, What ?, What ??
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबमध्ये कॉँग्रेसला ११७ पैकी १५ जागाही मिळणार नाहीत, कॅ. अमरिंदर सिंग सैनिक आहे, ते हरणार नाही, पत्नी परनीत कौर यांचा विश्वास
- भायखळा कारागृहात तब्बल ४३ महिला कैद्यांना कोरोनाची लागण
- महाराष्ट्र सरकारचा जमीनाचा रेट १६ कोटीरुपये, ऐवढा रेट असेल तर मी कुठून रस्ते बांधणार, नितीन गडकरी यांचा सवाल
- ओमर अब्दुल्ला यांनी उत्तर प्रदेशची तुलना केली जम्मू-काश्मीरशी, संतप्त नेटकरी म्हणाले येथे इथे धर्मांतर न केल्यास कोणालाही बळजबरीने राज्य सोडण्याची वेळ येत नाही