वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रेप एन्जॉय करा, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे वरिष्ठ कर्नाटकचे काँग्रेसचे वरिष्ठ आमदार के. आर. रमेश यांच्यावर आज सगळीकडून जबरदस्त टीकेची झोड उठली आहे. काँग्रेस पक्षातल्या महिला आमदारांनी देखील त्यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. Congress MLA K. R. Ramesh apologized on his enjoy rape statement with ifs and but language
समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रमेश यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतकी वर्षे राजकारणात राहून रमेश यांच्यासारख्या ज्येष्ठ आमदाराला साधी सभ्यता कळत नसेल तर त्यांच्यावर काय संस्कार झाले आहेत हे लक्षात येते. सरकारने त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. महिलांविषयी याप्रकारचे अपशब्द कोणत्याही नेत्याने काढले तरी त्याला नुसत्या माफीवर सोडता कामा नये, असे जळजळीत उद्गार जया बच्चन यांनी काढले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील त्यांना दुजोरा दिला. रमेश हे मागील काळात मंत्री राहिले आहेत काँग्रेस सारख्या जबाबदार पक्षाने त्यांच्यावर कठोर कारवाई करून आपली जबाबदारी सिद्ध करावी, असे वक्तव्य इराणी यांनी केले आहे.
आमदार रमेश यांनी हे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियातून देखील टीकेची झोड उठली आहे. आज ते जेव्हा विधान सौंधमध्ये आले तेव्हा पत्रकारांनी त्यांना गाठले. परंतु, एकाही पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर न देता ते फक्त नकाराचा हात हलवत विधानसौंधच्या पायऱ्यांवरून विधान सभेत सभागृहात निघून गेले. परंतु तेथे देखील त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. त्यावेळी त्यांनी “जर – तर”च्या भाषेत माफी मागितली. जर माझ्या वक्तव्यामुळे महिलांना अपमान झाले, असे वाटत असेल तर मी त्यांची माफी मागतो, असे ते म्हणाले.
त्यावर विधानसभेच्या सभापतींनी आता या विषयावर पडदा पाडावा असे सांगितले. परंतु तरी देखील आमदार रमेश यांच्यावर टीकेची झोड कमी होताना दिसत नाही. सोशल मीडियात महिलांनी त्यांच्याविरुद्ध मोहीमच उघडली आहे. एवढे होऊनही आमदार रमेश यांच्या भाषेत फारसा फरक पडलेला नाही त्यांनी जर – तरची भाषा न सोडता माफी मागितली आहे. आता त्यांच्यावर काँग्रेस पक्ष नेमकी काय कारवाई करतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Congress MLA K. R. Ramesh apologized on his enjoy rape statement with ifs and but language
महत्त्वाच्या बातम्या
- महिलांच्या डब्यामध्ये सीसीटीव्हीची नजर; लोकलच्या प्रवासात गुन्हेगारीला आळा
- बांगलादेशातील भव्य रमणा काली मंदिराचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन; पाकिस्तानी फौजेने केले होते उद्ध्वस्त!!; भारताने पुन्हा दिले बांधून!!
- जानेवारीत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉनची रुग्ण आढळून येण्याची शक्यता ; तज्ज्ञांचा धक्कादायक दावा
- CONGRESS CONTROVERSY : संतापजनक!कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश कुमार सभागृहात म्हणाले -‘बलात्काराचा आनंद घ्या’;सभापतीही हसले ; कॉंग्रेसच्या महिला नेत्या संतापल्या
- आक्रितच, उत्तर कोरियातील नागरिकांना अकरा दिवस हसण्यास बंदी