• Download App
    काँग्रेस नेते आता ममतांनाही सोडणार नाहीत!!; मोदींबरोबरच त्याही तितक्याच प्रखरतेने टार्गेटवर!! । Congress leaders will not let go of Mamata now !!; Along with Modi, he is also on target with the same intensity !!

    काँग्रेस नेते आता ममतांनाही सोडणार नाहीत!!; मोदींबरोबरच त्याही तितक्याच प्रखरतेने टार्गेटवर!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत संयुक्तरीत्या संयुक्त लोकशाही आघाडी अर्थात युपीएचे अस्तित्व पुसून टाकल्यानंतर काँग्रेसचे नेते प्रचंड संतापले असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखेच ममता बॅनर्जी यांना देखील राजकीय दृष्ट्या प्रखरतेने टार्गेट करण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतला आहे. Congress leaders will not let go of Mamata now !!; Along with Modi, he is also on target with the same intensity !!

    ममता बॅनर्जी यांच्यासह शरद पवार, वायएसआर काँग्रेसचे नेते जगन मोहन रेड्डी, टीआरएसचे नेते चंद्रशेखर राव आदींना टार्गेट करण्यासाठी राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे, वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग आणि काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्याकडे खास जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

    ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी यूपीएचे अस्तित्व पुसून टाकल्या नंतर बुधवारी रात्री काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे खास बैठक झाली. आणि त्यामध्ये ममता बॅनर्जी यांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखेच राजकीयदृष्ट्या टार्गेट करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पश्चिम बंगाल मधल्या विविध घोटाळ्यांवर आणि गैरव्यवहारांवर लक्ष केंद्रित करून यावर प्रखर हल्ले हे काँग्रेसचे नेते चढवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपची लढायचे असेल तर काँग्रेस पक्षाला वगळून चालणार नाही, ही भूमिका आधीच काँग्रेसच्या नेत्यांनी मांडली आहे. परंतु तरीही ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी युपीए अस्तित्वातच नाही, असे सांगून थेट सोनिया गांधी यांना आव्हान दिल्यामुळे काँग्रेसचे नेते संतप्त झाले आहेत.



    काँग्रेसचे नेते श्रीनिवास म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली तर त्या टीकाकारांना भाजप देशद्रोही म्हणतो, तर ममता दीदींना कुठलाही प्रश्न विचारला तर तृणमूल काँग्रेसचे नेते त्या प्रश्न विचारणार्‍या नेत्याला माओवादी ठरवून मोकळे होतात!!

    सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची भाषा करत त्या एकजुटीतून काँग्रेसला वगळणे यामुळेच काँग्रेस हायकमांड अस्वस्थ झाली आहे. काँग्रेसच्याच परिवारातून बाहेर पडून हे हे नेते वेगवेगळी काँग्रेसचीच नावे धारण करून मूळ काँग्रेसवर टीकास्त्र सोडतात. त्यांना तितक्याच प्रखरतेने टार्गेट करण्याचे काम दिग्विजयसिंग, मल्लिकार्जुन खर्गे रणदीप सुरजेवाला आदी नेत्यांवर सोपविण्यात आले आहे. यामध्ये वायएसआर काँग्रेस, टीआरएस या पक्षाच्या नेत्यांचा देखील समावेश आहे. हे नेतेदेखील काँग्रेसमधून बाहेर पडून मूळ काँग्रेसला कायम ठोकत असतात. राजकीयदृष्ट्या त्यांना देखील इथून पुढे सोडायचे नाही, असा निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे.

    Congress leaders will not let go of Mamata now !!; Along with Modi, he is also on target with the same intensity !!

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य