विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पोरासोरांच्या कारभाराला विरोध करत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांना विरोध केला आहे. गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी हार्दिक पटेल नको रे बाबा, असे म्हटले आहे.दिल्लीत राहुल गांधी यांनी गुजरात काँग्रेसच्या नेत्यांसोबत २०२२ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी आणि नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीबाबत बैठक घेतली.Congress leaders reject childish rule, Hardik Patel not to be Gujarat’s state president
बैठकीत हार्दिक पटेलना प्रदेशाध्यक्ष बनवण्याच्या चर्चेला अनेक बड्या नेत्यांनी तीव्र विरोध व्यक्त केला. राहुल गांधी यांनी पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि प्रभारी रघु शर्मा यांच्यासोबतीने सर्व नेत्यांशी एक-एक करून चर्चा करण्याबरोबरच सर्व नेत्यांसोबत वन-टू-वन बैठक घेतली. वन-टूवन बैठकीत राहुल गांधी यांनी सर्व नेत्यांचे मत घेतले.
पटेल यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्याच्या चर्चेवर अनेक वरिष्ठ नेत्यांनी आपला निषेध नोंदवला. हार्दिक पटेल यांना प्रदेशाध्यक्ष केले गेले तर पक्षही सोडू शकतो, असा इशारा काही नेत्यांनी दिला.
हार्दिक पटेल हे वयाने खूप लहान आहेत.
त्यांच्याकडे फारसा अनुभवही नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हार्दिक अजूनही एका विशिष्ट जातीचा नेता म्हणून ओळखला जातो, म्हणजेच फक्त पटेल जे पक्षाच्या विरोधात जाऊ शकतात. राज्याचे मुख्यमंत्री देखील पटेल आहेत. पटेल समाजाला निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचे असेल तर ते मुख्यमंत्र्यांना निवडून देतील, असे या नेत्यांनी म्हटले आहे.
Congress leaders reject childish rule, Hardik Patel not to be Gujarat’s state president
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा बाप काढला; अजितदादा म्हणाले “नो कॉमेंट्स”
- चिथावणीखोर भाषणे; जेएनयूचा विद्यार्थी शर्जील इमामचा जामीन अर्ज साकेत कोर्टाने फेटाळला
- महाराष्ट्रात देशाच्या १२ टक्के लसीकरण!,ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
- ‘लसीकरण मोहिमेवर व्हीआयपी संस्कृतीचा दबदबा नव्हता’, पंतप्रधान मोदींच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातील टॉप 10 मुद्दे
- पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
- ‘जनतेसोबत घृणास्पद विनोद सुरू आहे’, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल