वृत्तसंस्था
पणजी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या तिथे तृणमूल काँग्रेसची पक्षबांधणी करण्यामध्ये मग्न आहेत. कालच त्यांनी काँग्रेसच्या नेत्या नफिसा अली आणि भारताचा टेनिस स्टार लिएंडर पेस या दोघांना तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश दिला. त्या गोव्यातील मच्छीमारांना देखील भेटल्या.Congress leader Rahul Gandhi to visit Goa today, months ahead of 2022 polls
त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आज काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी हे गोव्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. ते आज डंबोलीन मध्ये एसपीएम स्टेडियम येथे काँग्रेसच्या मेळाव्याला संबोधित करतील. या खेरीज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची दीर्घकाळ बैठक घेतील. राहुल गांधी यांच्या दौऱ्यातही मच्छीमारांना भेटण्याचा समावेश आहे. ते उद्या वेळोसा येथे मच्छिमार समुदायाची भेट घेऊन त्यांच्यासमवेत भोजन करणार आहेत. पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष विवेक चोडणकर यांनी ही माहिती पीटीआय वृत्तसंस्थेला दिली.
हंगामी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नुकतीच नवी दिल्लीत पक्षाच्या सरचिटणीस आणि प्रभारी यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये काँग्रेसचा विस्ताराचा सविस्तर कार्यक्रम आखण्यात आला. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे या दृष्टीनेच विविध राज्यांमध्ये दौरे सुरू आहेत. गोवा हा त्यातला एक महत्त्वाचा पाडाव आहे.
ममता बॅनर्जी यांनी देखील गोव्यासारख्या छोट्या राज्याला राजकीयदृष्ट्या टार्गेट करून तृणमूल काँग्रेसच्या विस्ताराची पायाभरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. ही पायाभरणी करताना मुख्यत्वे त्यांचा भर भाजपवर तोंडी तोफा डागत असताना प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष फोडण्यावर राहिला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा गोवा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
Congress leader Rahul Gandhi to visit Goa today, months ahead of 2022 polls
महत्त्वाच्या बातम्या
- प्रसिद्ध कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या आकस्मित निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
- स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सात बेड्या तोडून हिंदुत्वाला सबळ केले; रणजित सावरकर यांचे प्रतिपादन
- शिवसेनेचे चार मोहरे राष्ट्रवादीत , कोकणात झाला करेक्ट कार्यक्रम
- केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी धूमधडाक्यात , ‘ या ‘ दिवशी मिळणार बोनससह DA च्या थकबाकीचे पैसे