प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मोदी – अदानींना अनुकूल भूमिका घेतल्यानंतर काँग्रेस नेत्यांचे पित्त खवळले आहे. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पवारांना उत्तर दिलेच आहे, पण आता दिल्लीतल्या काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी एक विशिष्ट ट्विट करून पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.Congress leader alka lamba targets sharad Pawar and PM Narendra modi over adani issue
गौतम अदानी आणि शरद पवार यांचा एका इमारतीच्या गच्चीतला फोटो शेअर करून अलका लांबा यांनी, डरे हुए लालची लोक आज तानाशाह के गुण गा रहे है!!, असे संतप्त उद्गार या ट्विटमध्ये काढले आहेत. या देशाच्या लोकांची लढाई फक्त आणि फक्त राहुल गांधी हेच लढत आहेत. चोर भांडवलदारांशी आणि त्या चोरांना वाचविणाऱ्या चौकीदाराशी फक्त राहुल गांधीच लढत आहेत आणि घाबरलेले लालची लोक स्वतःच्या स्वार्थासाठी त्या हुकूमशहाचे गुण गाण्यात मग्न आहेत, अशा आशयाचे ट्विट अलका लांबा यांनी केले आहे.
राहुल गांधींनी सातत्याने अदानींच्या शेल कंपनीत 20000 कोटी रुपये आले कुठून?, हा प्रश्न लावून धरल्यानंतर काँग्रेस नेते देखील त्यांच्याभोवती एकवटले आहेत आणि ज्यावेळी शरद पवारांनी अदानी आणि मोदी यांना अनुकूल भूमिका घेताच ते पवारांवर तुटून पडले आहेत. अलका लांबा यांनी केलेले ट्विट त्याचेच निदर्शक आहे.
नानांचा पवारांवर निशाणा
त्याआधी नाना पटोले यांनी देखील शरद पवारांची भूमिका त्यांची त्यांना लखलाभ होवो आम्ही अदानी आणि मोदी यांच्या विरोधात संघर्ष कायम ठेवून जिंकूच, असा इशारा दिला आहे. एकूण काँग्रेस प्रणित विरोधी ऐक्य साधण्याच्या प्रयत्नात पवारांनी पाचर मारल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी संतापून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
भाजपचे काँग्रेसला चिमटे
पण नेमके याच मुद्द्यावर भाजपने मात्र काँग्रेसला चिमटे काढले आहेत. शरद पवारांवर अलका लांबा यांनी केलेले ट्विट आपल्या ट्विटर हँडल वरून शेअर करत भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का?, असा बोचरा सवाल केला आहे. त्यावर अजून काँग्रेसचे अधिकृत उत्तर यायचे आहे, मात्र त्यापूर्वी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी ते पवारांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगून तो प्रश्न टोलावला आहे.
Congress leader alka lamba targets sharad Pawar and PM Narendra modi over adani issue
महत्वाच्या बातम्या
- मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है : भारत बनला जगातील चौथा सर्वात मोठा मासळी निर्यातदार देश!
- Charanjit Singh Channi : चरणजीत सिंह चन्नी भाजपमध्ये जाणार? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा!
- मागील ६५ वर्षांत भारतात ७४ विमानतळं होती, तर गेल्या ९ वर्षांतच अतिरिक्त ७४ विमातळं व हेलीपोर्ट उभारले गेले – ज्योतिरादित्य शिंदे
- Kiren Rijiju Car Accident : किरेन रिजिजू यांच्या कारला ट्रकची धडक, केंद्रीयमंत्री थोडक्यात बचावले!