कर्नाटकातील जनतेला १६ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची दिली भेट
प्रतिनिधी
मंड्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) कर्नाटकच्या जनतेला १६ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची भेट दिली. त्यांनी बंगळुरू-म्हैसूर द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन केले आणि म्हैसूर-कुशालनगर 4-लेन महामार्गाची पायाभरणी केली. यासोबतच पंतप्रधानांनी आणखी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. Congress is dreaming of digging a grave of Modi while Modi is busy in easing the lives of poor PM Modi in Mandya
मंड्यामध्ये रोड शो नंतर पंतप्रधानांनी जाहीर सभेला संबोधित केले. पंतप्रधानांचे म्हणणे ऐकण्यासाठी हजारो लोक आले होते. भाषणादरम्यान पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले की ”काँग्रेस मोदीची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहे आणि मोदी बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे बांधण्यात आणि गरिबांचे जीवन सुलभ करण्यात व्यस्त आहे.” याशिवाय कोट्यवधी माता, भगिनी आणि देशवासीयांचे आशीर्वाद हेच आपले संरक्षण कवच असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, २०१४ पूर्वी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. गरीब माणसाला उद्ध्वस्त करण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. जो पैसा गरिबांच्या विकासासाठी होता, ते हजारो कोटी रुपये काँग्रेस सरकारने लुटले. काँग्रेसने गरिबांच्या दु:खाची कधीच पर्वा केली नाही. २०१४ मध्ये तुम्ही मला सेवेची संधी दिली तेव्हा देशात गरिबांचे सरकार स्थापन झाले. गरिबांच्या वेदना समजून घेणारे सरकार स्थापन झाले. केंद्र सरकारने प्रामाणिकपणे गरिबांची सेवा करण्याचा प्रयत्न केला.
याचबरोबर, “कर्नाटकच्या जनतेकडून मला प्रचंड प्रेम मिळाले आहे. जलद विकासाच्या माध्यमातून तुमच्या प्रेमाचे ऋण व्याजासह फेडण्याचा डबल इंजिन सरकारचा प्रयत्न आहे. हजारो कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि त्यासाठी आज पायाभरणी केली जात आहे.” हा प्रयत्नांचाच एक भाग. गेल्या अनेक दिवसांपासून देशात बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वेची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भव्य आधुनिक एक्सप्रेसवे भारतात सर्वत्र बांधले जावेत अशी युवा पिढीची इच्छा होती. बेंगळुरू-म्हैसूर हा एक्सप्रेस वे पाहून आमच्या तरुणांना अभिमान वाटतो.”
Congress is dreaming of digging a grave of Modi while Modi is busy in easing the lives of poor PM Modi in Mandya
महत्वाच्या बातम्या
- ब्रिटिश सरकारवर टीका केल्याने बीबीसीने क्रीडा तज्ज्ञाला काढून टाकले, भारताचा सवाल- ही कसली पत्रकारिता?
- वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पुढील वर्षी पूर्ण होणार देहू-आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग, मार्ग चौपदरी होण्याची गडकरींची ग्वाही
- हैदराबादेत पोहोचले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आज CISF स्थापना दिन परेडमध्ये होणार सहभागी
- P.M.मोदींचे सानिया मिर्झाला पत्र, इतर खेळाडूंना मिळाले इन्स्पिरेशन!