• Download App
    उत्तर प्रदेशात प्रियांका कार्ड पुन्हा active; भाजपवर तोफा डागायला केली सुरूवात; राज्याचे नेतृत्व करण्याबाबत मात्र मौन Congress General Secretary and Uttar Pradesh Incharge Priyanka Gandhi Vadra to visit Lucknow on July 14.

    उत्तर प्रदेशात प्रियांका कार्ड पुन्हा active; भाजपवर तोफा डागायला केली सुरूवात; राज्याचे नेतृत्व करण्याबाबत मात्र मौन

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – पश्चिम बंगाल आणि आसामच्या विधानसभा निवडणूकांमध्ये काही काळ active राहिलेले प्रियांका गांधी कार्ड मधल्या काळात deactivate झाले होते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूका जवळ येताच ते पुन्हा active झाले आहे. Congress General Secretary and Uttar Pradesh Incharge Priyanka Gandhi Vadra to visit Lucknow on July 14.

    प्रियांका गांधी या १४ जुलैला लखनौच्या दौऱ्यावर येत असून त्यांनी आज काँग्रेसच्या सल्लागार समितीची आणि व्यूहरचना गटाची (Congress Advisory Council and Strategic Group) बैठक घेतली.

    या बैठकीत काँग्रेसचे उत्तर प्रदेशात नेतृत्व कोणी करायचे या विषयावरची चर्चा सोडून अन्य सगळ्या विषयांवर चर्चा झाली. मध्यंतरी काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी प्रियांका गांधी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करून योगी आदित्यनाथ यांना चांगली टक्कर देता येईल, अशी सूचना केली होती. पण त्या सूचनेवर बैठकीत चर्चा झाली की नाही, हे सूत्रांनी सांगितले नाही.

    उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणूकांमध्ये भाजपने हिंसाचार माजविला. दगडफेक केली. गोळ्या चालविल्या आणि निवडणूका जिंकल्या असा गंभीर आरोप प्रियांका गांधी यांनी बैठकीत केला. त्यातून काँग्रेसजनांना भाजपवर टीकास्त्र सोडायला एक महत्त्वाचा मुद्दा हाती मिळाल्याचे मानण्यात येत आहे.

    १४ जुलैला प्रियांका गांधी लखनौला येत आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाचा कोणता कार्यक्रम आहे, त्याचे तपशील अद्याप जाहीर झालेले नाहीत.

    Congress General Secretary and Uttar Pradesh Incharge Priyanka Gandhi Vadra to visit Lucknow on July 14.

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे