• Download App
    WATCH : स्थापना दिनीच पडला काँग्रेसचा झेंडा, पक्ष कार्यालयात झेंडा फडकावताना सोनिया गांधींनी दोरी ओढताच निसटला। Congress Flag Falls Off While Being Hoisted By Party's Interim President Sonia Gandhi On The Party's 137th Foundation Day

    WATCH : स्थापना दिनीच पडला काँग्रेसचा झेंडा, पक्ष कार्यालयात झेंडा फडकावताना सोनिया गांधींनी दोरी ओढताच निसटला

    काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत एक विचित्र घटना घडली. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सोनिया आल्या होत्या, मात्र त्यांनी दोरी ओढताच झेंडा त्यांच्या अंगावर पडला. Congress Flag Falls Off While Being Hoisted By Party’s Interim President Sonia Gandhi On The Party’s 137th Foundation Day


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत एक विचित्र घटना घडली. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सोनिया आल्या होत्या, मात्र त्यांनी दोरी ओढताच झेंडा त्यांच्या अंगावर पडला.

    सोनियांनी पक्षाच्या झेंड्याची दोरी ओढली तेव्हा एक कार्यकर्ताही तिथे उपस्थित होता. ध्वजारोहण करताना त्याने सोनियांना मदत करण्याचा प्रयत्न केला, पण झेंडा निसटून थेट त्यांच्या अंगावर पडला. या घटनेने तेथे उपस्थित सर्व काँग्रेसजन हादरले. यानंतर एक महिला कर्मचारी धावत आली आणि तिनेही ध्वजारोहणासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते होऊ शकले नाही.

    अखेर सोनिया गांधींनी स्वतःच्या हाताने पक्षाचा झेंडा फडकवला. या संपूर्ण घटनेत सोनिया कुठेही विचलित झालेल्या दिसल्या नाहीत, त्यांची प्रतिक्रिया अतिशय शांत होती. काँग्रेसच्या १३७व्या स्थापना दिनानिमित्त सोनिया पक्ष कार्यालयात पोहोचल्या होत्या.

    Congress Flag Falls Off While Being Hoisted By Party’s Interim President Sonia Gandhi On The Party’s 137th Foundation Day

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Govt Bans : सरकारने 16 औषध संयोजनांवर बंदी घातली; त्वचा आणि कॉस्मेटिक उत्पादने देखील समाविष्ट, म्हटले – यांच्या उपचारात फायद्यापेक्षा जास्त धोका

    Ram Mandir : राम मंदिर देणगी चोरी- चंपतराय यांच्यावर कारवाई जवळपास निश्चित:विश्वस्त अनिल यांनाही हटवले जाऊ शकते, SIT योगींना अहवाल सादर करणार

    PM Modi : मोदी म्हणाले- बंगालला पाकिस्तानचा भाग बनवण्याचा प्रयत्न झाला; धार्मिक अजेंडा राबवला गेला, घुसखोरांकडून ताबा मिळवला गेला; आता कायद्याचे राज्य