काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत एक विचित्र घटना घडली. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सोनिया आल्या होत्या, मात्र त्यांनी दोरी ओढताच झेंडा त्यांच्या अंगावर पडला. Congress Flag Falls Off While Being Hoisted By Party’s Interim President Sonia Gandhi On The Party’s 137th Foundation Day
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत एक विचित्र घटना घडली. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सोनिया आल्या होत्या, मात्र त्यांनी दोरी ओढताच झेंडा त्यांच्या अंगावर पडला.
सोनियांनी पक्षाच्या झेंड्याची दोरी ओढली तेव्हा एक कार्यकर्ताही तिथे उपस्थित होता. ध्वजारोहण करताना त्याने सोनियांना मदत करण्याचा प्रयत्न केला, पण झेंडा निसटून थेट त्यांच्या अंगावर पडला. या घटनेने तेथे उपस्थित सर्व काँग्रेसजन हादरले. यानंतर एक महिला कर्मचारी धावत आली आणि तिनेही ध्वजारोहणासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते होऊ शकले नाही.
अखेर सोनिया गांधींनी स्वतःच्या हाताने पक्षाचा झेंडा फडकवला. या संपूर्ण घटनेत सोनिया कुठेही विचलित झालेल्या दिसल्या नाहीत, त्यांची प्रतिक्रिया अतिशय शांत होती. काँग्रेसच्या १३७व्या स्थापना दिनानिमित्त सोनिया पक्ष कार्यालयात पोहोचल्या होत्या.
Congress Flag Falls Off While Being Hoisted By Party’s Interim President Sonia Gandhi On The Party’s 137th Foundation Day
महत्त्वाच्या बातम्या
- उद्धव ठाकरे – शरद पवार चर्चा, कायदेशीर बाबी तपासल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक रद्द!!
- रोहिणी खडसे यांच्या गाडीवरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध ; चंद्रकांत पाटील विधानसभेत आवाज उठविणार
- लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंडला जर्मनीतून अटक
- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना; ट्विट करून माहिती