• Download App
    राहूल, प्रियंकाच्या लसीबाबतच्या भूमिकेवर कॉँग्रेस नेते शशी थरुर यांचेच प्रश्नचिन्ह, आता लस इतर देशांना का देत नाही असा सरकारला केला सवाल|Congress criticises vaccine diplomacy and Shashi Tharoor's question mark, why the government is not giving vaccines to other countries now

    राहूल, प्रियंकाच्या लसीबाबतच्या भूमिकेवर कॉँग्रेस नेते शशी थरुर यांचेच प्रश्नचिन्ह, आता लस इतर देशांना का देत नाही असा सरकारला केला सवाल

    सरकारने राबविलेल्या लसमैत्री उपक्रमावरून कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी आणि प्रियंका गांधी सरकारवर टीका करत आहेत. मात्र, त्यांच्या भूमिकेला कॉँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीच आव्हान दिले आहे. लस इतर देशांना का देत नाही, असा सवाल सरकारला करताना आपल्याच पक्षाच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.Congress criticises vaccine diplomacy and Shashi Tharoor’s question mark, why the government is not giving vaccines to other countries now


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सरकारने राबविलेल्या लसमैत्री उपक्रमावरून कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी आणि प्रियंका गांधी सरकारवर टीका करत आहेत. मात्र, त्यांच्या भूमिकेला कॉँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनीच आव्हान दिले आहे.

    लस इतर देशांना का देत नाही, असा सवाल सरकारला करताना आपल्याच पक्षाच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे की



    भारताने लसींची निर्यात बंद केल्याने त्याचा ९१ देशांतील कोरोनाच्या रुग्णांवर परिणाम होणार आहे. या देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती आहे. शशी थरुर यांनी सौम्या स्वामीनाथन यांचे वक्तव्य ट्विट करत म्हटले आहे

    की जागतिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ अधिकारी जेव्हा म्हणतात की भारताने निर्यात बंद केल्याचा परिणाम ९१ देशांवर होणार आहे त्यावेळी विश्वगुरूंची मान शरमेने खाली झुकायला हवी.

     

    मात्र, हे ट्विट करताना शशी थरुर विसरले की त्यांच्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लसमैत्री कार्यक्रमावर टीका केली होती. पंतप्रधानांवर टीका करताना प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की भारतीय मुलांच्या हक्काची लस तुम्ही निर्यात का केली.

    कॉँग्रेसने भारताने इतर देशांना कोरोना लसी पुरविण्याबाबत देशवासियांमध्ये संभ्रम निर्माण केला. वास्तविक भारतात झालेल्या लसीकरणाच्या तुलनेत मोदी सरकारने मित्र देशांना अगदी थोड्या कोरोना लसी पुरविल्या होत्या.

    मात्र, यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा उजळून निघून संबंधित देशांमध्ये भारतीयांबाबत आत्मियता निर्माण झाली होती. कारण अनेक देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संकटाचा सामना करत असताना भारताने त्यांना मदत केली होती.

    कॉँग्रेसमुळे देशात संभ्रम पसरल्याने सरकारने लसमैत्री उपक्रम काही काळासाठी स्थगित केला आहे. मात्र, आता पुन्हा शशी थरुर लस निर्यात का बंद केली असे विचारत आहेत.

    एका बाजुला टीका करायची आणि दुसऱ्या बाजुला इतर देशांना लस का पुरवित नाही असा सवाल करून कॉँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी पुन्हा एकदा दुटप्पीपणा दाखवून दिला आहे. कॉँग्रेसची कोरोना प्रतिबंधक लसीबाबतची भूमिकाच गोंधळलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    Congress criticises vaccine diplomacy and Shashi Tharoor’s question mark, why the government is not giving vaccines to other countries now

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के