• Download App
    आक्रमक नानांच्या थेट सोनियांपर्यंत तक्रारी; पण "भांड्याला भांडे" म्हणत राष्ट्रवादीची अजून सबुरी!! पण का?? Complaints of aggressive Nana directly to Sonia

    आक्रमक नानांच्या थेट सोनियांपर्यंत तक्रारी; पण “भांड्याला भांडे” म्हणत राष्ट्रवादीची अजून सबुरी!! पण का??

    सध्या शिवसेना आणि भाजपच्या प्रदेश नेतृत्वामध्ये प्रचंड घमासान सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस – राष्ट्रवादीत देखील सारे काही आलबेल नाही किंबहुना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश यांच्यामध्ये देखील नेमकी तशीच भांडणे सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादीवर रोज एकापाठोपाठ एक प्रहार करत आहेत. पण राष्ट्रवादीचे नेते मात्र हातातले आयते आलेले सरकार आणि हातातली खाती गमावण्याच्या भीतीने “भांड्याला भांडे लागतेच”, असे म्हणत सबुरीने घेत आहेत.
    Complaints of aggressive Nana directly to Sonia

    नानांचा हल्लाबोल

    भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला डावलून भाजपशी समझोता केल्यानंतर संतप्त झालेल्या नाना पटोले यांनी गेले 3 – 4 दिवस भाजपशी आघाडी करून काँग्रेसच्या पाठीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खंजीर खुपसला आहे. पवार कुटुंबियांचा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे, पण मी त्याबद्दल काही बोलणार नाही. पण आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याने त्याचे उत्तर नक्की देऊ, असे इशारे देत आहेत. त्यापलिकडे जाऊन नाना पटोले यांनी थेट सोनिया गांधी यांच्याकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांची विरुद्ध तक्रार केली आहे आणि याचे परिणाम लवकरच दिसतील, असा इशारा देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.

    – सुप्रिया – अजित पवारांची सबुरी

    नाना पटोले दररोज अशा फैरी झडत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र “भांड्याला भांडे लागतच असते”, “एका कुटुंबात किंवा एका संसारात भांडणे असतात तर इथे तर तीन पक्ष आहेत. त्यांच्यात थोडीफार भांडणे ही होणारच”, असे सांगून सारवासारव करत आहेत.



    – पृथ्वीराज चव्हाण सरकार राष्ट्रवादीने पाडले

    पण याचा नेमका राजकीय अर्थ काय?? तर काँग्रेस धडाकेबाज निर्णय घेऊन ठाकरे – पवार सरकार पाडू शकते, असा आहे. असे तडकाफडकी निर्णय घेऊन सरकारे पाडण्यामध्ये काँग्रेस माहीर आहे. केंद्रातल्या चंद्रशेखर, देवेगौडा आय के गुजराल यांच्या सरकारांना काँग्रेसने एका झटक्यात खाली आणून दाखवले होते. इतकेच काय तर काँग्रेसला पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार राष्ट्रवादीने खाली खेचल्याचा राजकीय बदल देखील घ्यायचा आहे!! त्यामुळे नाना पटोले यांच्या मुखातून जणू हायकमांडच्या बोलत आहे, असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे!!

    – राष्ट्रवादी सत्तेतली “वाटेकरी”

    आता ही बाब लक्षात आल्यामुळेच की काय राष्ट्रवादीचे नेते सध्या सबुरीने घेत असल्याचे दिसत आहेत. एक तर राष्ट्रवादीला आपल्या राजकीय मर्यादांची पक्की जाणीव आहे. आपली भाजप सारखी मजबूत संघटना नाही. शिवसेनेने सारखी भरारी मारण्याची क्षमता नाही. आपल्याला महाराष्ट्राची जी काय सत्ता मिळेल, ती कोणात तरी “वाटेकरी” राहूनच मिळेल, याची राष्ट्रवादीला पक्की खात्री आहे!! त्यामुळे एकीकडे स्थानिक पातळीवर काँग्रेसला फोडायचे – डिवचायचे आणि राज्य पातळीवर मात्र सबुरीची भूमिका घ्यायची, अशी दुहेरी भूमिका राष्ट्रवादीचे नेते घेत आहेत.

    पण खरच नाना पटोले म्हणतात तसे काँग्रेसच्या डोक्यावरून पाणी चाललेय असे सोनिया आणि राहुल गांधी यांना वाटत असेल, त्यांनी मनात काही निश्चित ठरवले असेल तर ते अमलात आणल्या शिवाय राहणार नाहीत आणि तिथे मात्र राष्ट्रवादीचे नेते तोकडे पडताना दिसतील… कारण असाच आजवरचा अनुभव आहे!!

    – हायकमांडचे इंडिकेशन काय

    आता नाना पटोले स्वतः एकटेच आघाडीवर राहून राष्ट्रवादीशी पंगा घेत आहेत. त्यामध्ये अन्य काँग्रेसचे नेते देखील राष्ट्रवादीशी पंगा घ्यायला उतरली तर त्यांना हायकमांड कडून निश्चित स्वरूपाचे इंडिकेशन आले आहे हे स्पष्ट होणार आहे.

    – शिवसेना – भाजपमध्ये भडका

    जसा सध्याच्या राजकीय वातावरणात शिवसेना आणि भाजप यांच्यातून विस्तव जात नाही तशीच अवस्था काँग्रेसने राष्ट्रवादी मध्ये येईल का?? काँग्रेस तुटेपर्यंत ताणून धरू शकते. पण राष्ट्रवादी असे करू शकेल का?? हा यातला कळीचा मुद्दा असणार आहे. येणारा काळच जसा शिवसेना आणि भाजपचा संघर्षाचे टोक गाठणारा असेल तसाच तो काँग्रेस – राष्ट्रवादीतला भडका उडवणारा असेल का?? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    – उदयपुर चिंतनाचे परिणाम दिसतील??

    काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिरानंतर पक्ष स्वतःच्या मूळ अस्तित्वाचा शोध घ्यायला लागला आहे हे दिसते आहे यासाठी त्यांना भाजपा बरं बरोबरच राज्यांच्या पातळीवर स्थानिक पक्षांची राजकीय पंगा घेणे भाग आहे त्याची तयारी नाना पटोले यांच्यासारख्या नेत्यांकडून काँग्रेस हायकमांड करून घेत आहे का??, असे वाटण्यासारखी सध्या परिस्थिती आहे.

    Complaints of aggressive Nana directly to Sonia

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य