• Download App
    आता बाजारात येणार रंगीत बटाटा ; कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती क्षमता वाढवण्यास होणार मदत । Colored potatoes will now hit the market; Corona will help boost the immune system during the period

    आता बाजारात येणार रंगीत बटाटा; कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती क्षमता वाढवण्यास होणार मदत

    • या बटाटय़ाचा बाह्य नव्हे तर आतील भाग रंगीत असेल. ग्वाल्हेर येथील रंगीत बटाटा संशोधन केंद्रात विकसित केला जात आहे. Colored potatoes will now hit the market; Corona will help boost the immune system during the period

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशविदेशात अनेक भाज्या वेगवेगळ्या रंगात उपलब्ध होतात. फ्लॉवर पांढऱ्या रंगात मिळायचा आता हिरव्या रंगाचा देखील फ्लॉवर बाजारात उपलब्ध आहे. तसेच आता बटाटय़ाची देखील भर पडणार आहे. या बटाटय़ाचा बाह्य नव्हे तर आतील भाग रंगीत असेल. ग्वाल्हेर येथील रंगीत बटाटा संशोधन केंद्रात विकसित केला जात आहे.

    लवकरच तो सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार आहे. हा रंगीत बटाटा कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती क्षमता वाढवू शकेल. चीननंतर हिंदुस्थान हा दुसऱ्या क्रमाकांचा बटाटा उत्पादक देश आहे.त्यामुळे बटाटय़ाचे नवे वाण विकसित करण्यावर संशोधकांचा भर आहे.



    ग्वाल्हेरच्या केंद्रातील संशोधकांनी बरीच मेहनत घेऊन या रंगीत बटाटय़ाची प्रजाती विकसित केली आहे. या बटाट्याच्या प्रजातीमध्ये आयर्न, कॅरटिन भरपूर प्रमाणात आहे. संशोधक डॉ. शिवप्रताप सिंह यांनी सांगितले की, हा बटाटा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. तसेच लहान मुले आणि महिलांमधील ऑनिमियाची समस्या दूर होईल.

    Colored potatoes will now hit the market; Corona will help boost the immune system during the period

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले