• Download App
    उत्तर प्रदेशातील कलेक्टर करणार पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व, दिव्यांग असूनही बॅडमिंटन चॅम्पीयन|Collector of Uttar Pradesh to represent India in Paralympics, Badminton champion despite disability

    उत्तर प्रदेशातील कलेक्टर करणार पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व, दिव्यांग असूनही बॅडमिंटन चॅम्पीयन

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कलेक्टर पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. कलेक्टर दर्जाच्या अधिकाºयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा प्रकारात देशाचे प्रतिनिधीत्व करण्याचा ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे सुुहास ललिनाकेरे यथीराज हे दिव्यांग असूनही बॅडमिटनपटू आहे.Collector of Uttar Pradesh to represent India in Paralympics, Badminton champion despite disability

    २००७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले सुहास हे राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियन आहे. सुहास यांनी प्रयागराज, आझमगड आणि जौनपूर सारख्या शहरांसाठी कलेक्टर म्हणून ( जिल्हा दंडाधिकारी) पद पद भूषवले आहे. गौतम बुद्ध नगरचे (नोएडा) कलेक्टर म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.



    मुळचे कर्नाटक राज्यातील असलेले सुहास हे दिव्यांग असूनही त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचे वडील सरकारी अधिकारी होते. त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने विविध शहरांत त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. सुहासने डॉक्टर व्हावे अशी त्याच्या कुटुंबाची इच्छा होती, पण इंजिनीअरिंगमुळे त्याला अधिक रस होता.

    कुटुंबियांनी त्यांना पूर्ण सहकार्य करत आवडीचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्या दिले. २००४ मध्ये त्यांनी प्रथम श्रेणीत संगणक विज्ञानात पदवी मिळविली. एक वर्ष संगणक अभियंता म्हणून काम केल्यावर आयुष्यात काहीतरी हरविल्यासारखे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. सुहास म्हणतात, मला मला देवाचे आभार मानायचे आहेत. कारण मी अभ्यास करत होतो तेव्हा स्वप्नातही वाटत नव्हते की जिल्हाधिकारी होईल.

    दिव्यांग असूनही खेळ हा त्यांचा जीव की प्राण होता. हौस म्हणून बॅडमिंटन खेळत असताना त्यांनी व्यावसायिक पध्दतीने खेळायला सुरूवात केली. 2016 मध्ये, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणारे ते पहिले शासकीय अदिकारी बनले. 2016 च्या आशियाई पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत त्यांना सुवर्णपदक मिळाले.

    याबाबत सुहास म्हणतात, कधीकधी आपण जिंकतो तर कधीकधी हरतोही. पणआपले प्रयत्न सुरू ठेवायला पाहिजेत. त्यामुळेच सुहास यांची २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.

    Collector of Uttar Pradesh to represent India in Paralympics, Badminton champion despite disability

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!