• Download App
    छत्तीसगडच्या विजापूरमधील पत्रकार गणेश मिश्राने काढला नक्षलवाद्यांच्या ताब्यातला जवान राकेश्वर सिंग मन्हासचा विडिओ | CoBRA jawan Rakeshwar Singh Manhas being released by Naxals in Chhattisgarh

    छत्तीसगडच्या विजापूरमधील पत्रकार गणेश मिश्राने काढला नक्षलवाद्यांच्या ताब्यातला जवान राकेश्वर सिंग मन्हासचा विडिओ

    वृत्तसंस्था

    विजापूर – छत्तीसगडमध्ये सीआरपीएफशी सुकूमाच्या जंगलात झालेल्या चकमकीनंतर नक्षलवाद्यांनी अपहरण करून जंगलात नेलेल्या राकेश्वर सिंग मन्हास या कोब्रा जवानाची नक्षलवाद्यांनी सुटका केली आणि तो विजापूरमधील सीआरपीएफ कॅम्पमध्ये सुखरूप दाखल झाला आहे. त्याचा नक्षलवाद्यांच्या ताब्यात असतानाचा विडिओ छत्तीसगडमधील विजापूरचे पत्रकार गणेश मिश्रा यांनी काढला आहे. तो एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. CoBRA jawan Rakeshwar Singh Manhas being released by Naxals in Chhattisgarh

    जवान राकेश्वर सिंग मन्हास याला दोरखंडाने बांधले आहे. समोर शेकडो सशस्त्र नक्षलवाद्यांची गर्दी आहे आणि दोन सशस्त्र नक्षलवादी राकेश्वर सिंगच्या दंडाला बांधलेले दोखखंड सोडत आहेत, असा हा जंगलातला विडिओ आहे. या विषयी गणेश मिश्रा यांनी एएनआयला माहिती दिली. ते म्हणाले, की मी जेव्हा राकेश्वर सिंगला नक्षलवाद्यांच्या कॅम्पमध्ये पाहिले, तेव्हा त्याला किरकोळ जखमा झालेल्या दिसल्या.



    चकमकीच्या दुसऱ्याच दिवशी नक्षलवाद्यांनी त्याला पकडल्याचे त्याने मला सांगितले. पण तो तेव्हाही सुखरूप होता आणि आताही सुखरूप आहे. त्याची तब्येतही ठीक आहे, अशी माहिती गणेश मिश्रा यांनी दिली.

    दरम्यान, राकेश्वर सिंग यांच्या सुखरूप सुटकेची माहिती मिळताच जम्मूतील त्यांच्या घरी जोरदार सेलिब्रेशन सुरू झाले असून आसपासचे नागरिकही या सेलिब्रेशनमध्ये सामील झाले.

    राकेश्वर सिंग मन्हास यांची पत्नी मीनू यांनी आपल्या जवान पतीच्या सुखरूप सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला असून सरकारचे आभार मानले आहेत. सरकारवर आमचा विश्वास होता. पण सरकारचे प्रतिनिधी काही बोलत नव्हते. स्वाभाविक आहे, काही गुप्त गोष्टी ते बाहेर सांगत नसतील, हे मी समजू शकते. पण आता आमचे वाईट दिवस सरले आहेत. ते आले की त्यांचे जोरदार स्वागत करू, अशा शब्दांमध्ये मीनू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    CoBRA jawan Rakeshwar Singh Manhas being released by Naxals in Chhattisgarh

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य