पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दावा केला आहे की, राज्यातील कोरोनाची परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत त्यांनी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा करावी, अशी मागणी केली. त्या म्हणाल्या की, लोकांना मतदान करण्याचा आणि विधानसभेवर निवडून जाण्याचा अधिकार आहे. cm mamta banerjee demands Election Commission For West Bengal Bypolls says corona completely controlled
वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दावा केला आहे की, राज्यातील कोरोनाची परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत त्यांनी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा करावी, अशी मागणी केली. त्या म्हणाल्या की, लोकांना मतदान करण्याचा आणि विधानसभेवर निवडून जाण्याचा अधिकार आहे.
सीएम ममता म्हणाल्या, “पश्चिम बंगालमध्ये कोरोना संसर्गाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. लोकांना मतदान करण्याचा आणि विधानसभेवर निवडून जाण्याचा अधिकार आहे. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुका जाहीर केल्या पाहिजेत, कारण आपण लोकांच्या लोकशाही अधिकारांवर अंकुश ठेवता कामा नये.”
शुभेंदु अधिकारींकडून ममतांचा झाला होता पराभव
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्या हातून पराभवाला सामोरे जावे लागले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी विधानसभा पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा करून तृणमूल काँग्रेसचे नेते शोभन देव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवून ते विधानसभेत पोहोचले होते.
ही विधानसभा जागा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पारंपारिक जागा राहिली आहे. पण जेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विधानसभा निवडणुकीत शुभेंदू अधिकारी यांच्याविरोधात नंदीग्राम सीटवरून लढण्यासाठी गेल्या होत्या, तेव्हा शोभन देव यांना टीएमसीच्या तिकिटावर येथून रिंगणात उतरवण्यात आले होते.
26 ऑगस्टला तृणमूल सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार
ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, टीएमसी 26 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानमधील सद्य:परिस्थितीवर परराष्ट्र मंत्रालयाच्या ब्रीफिंगमध्ये सहभागी होईल. 26 ऑगस्ट रोजी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर संसदेत विविध पक्षांच्या नेत्यांना अफगाणिस्तानमधील घडामोडींबाबत माहिती देतील. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, ही सभा सकाळी 11 वाजता संसद भवनातील अॅनेक्सीमध्ये होणार आहे.
प्रल्हाद जोशी यांचे ट्वीट, “संसदेत विविध पक्षांच्या नेत्यांना परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर 26 ऑगस्ट सकाळी 11 वाजता मुख्य समिती कक्ष, पीएचए, नवी दिल्ली येथे अफगाणिस्तानच्या सद्य:परिस्थितीबद्दल माहिती देतील. ईमेलद्वारे आमंत्रणे पाठवली जात आहेत. सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे ही विनंती.”
cm mamta banerjee demands Election Commission For West Bengal Bypolls says corona completely controlled
महत्त्वाच्या बातम्या
- National Monetisation Pipeline : केंद्र सरकार कसे उभारणार 6 लाख कोटी रुपये, कोणत्या क्षेत्रातून होणार निर्गुंतवणूक? वाचा सविस्तर…
- प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना कर्करोगाचे निदान, शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
- धक्कादायक : मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी उसने घेतले होते 500 रुपये, सावकाराने कैक महिने शेतात राबवले; हतबल वडिलांची आत्महत्या
- Dahi Handi : या वर्षीही गोविंदांची निराशाच! परवानगी नाकारल्याने भाजपचा ठाकरे सरकारविरोधात आंदोलनाचा पवित्रा
- अबब! : कोरोनाशी लढण्यासाठी BMCने तब्बल 2000 कोटींचा केला खर्च, दरमहा 200 कोटींपेक्षा जास्त