• Download App
    चीन भारतासह शेजारील देशांना निर्माण करतोय धोका, अमेरिकेने दिला इशारा |China poses threat to India, neighbors, US warns

    चीन भारतासह शेजारील देशांना निर्माण करतोय धोका, अमेरिकेने दिला इशारा

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : अमेरिकेने चीनला पुन्हा एकदा इशारा दिला असून शेजारील देशांना धोका निर्माण करतोय असे म्हटले आहे. चीन हा भारतासह इतर शेजारी देशांच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत आहे, असे अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी म्हटले आहे. भारतालगतच्या सीमाभागात चीन आपल्या हद्दीत लष्करी व नागरी अशा दोन्ही हेतूंनी वापरण्यात येणाऱ्या सुविधा उभारून शेजारी देशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करत असल्याचेही ऑस्टिन म्हणाले.China poses threat to India, neighbors, US warns

    रताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह व परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेप्रसंगी ऑस्टिन यांनी सांगितले की, सार्वभौमत्व व स्वरक्षणासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांना अमेरिकेची नेहमीच साथ राहील. भारत व अमेरिका यांचे संबंध अधिक दृढ होण्याकरिता आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.



    भारताचे परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावरआहेत. युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाबाबत भारत व अमेरिका यांची निरनिराळी मते आहेत. मात्र, चीनबाबतचा दृष्टिकोन व संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याचा विचार याबाबत दोन्ही देशांची मते सारखी आहेत.

    हे लक्षात घेऊन अमेरिका व भारताच्या संरक्षणमंत्री व परराष्ट्रमंत्र्यांनी वॉशिंग्टनमध्ये सविस्तर चर्चा केली. अंतराळ स्थितीच्या माहितीची देवाणघेवाण वाढविण्यासाठी दोन्ही देशांनी एक करार केला. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ॲन्टोनी ब्लिंकन हेदेखील यावेळी उपस्थित होते.

    China poses threat to India, neighbors, US warns

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र