• Download App
    भारतापेक्षाही पाकिस्ताव व चीनकडे अधिक अण्वस्त्रे, जगात रशियाकडे सर्वाधिक शस्त्रे|Chin and Pakistan have more nuclear weapons

    भारतापेक्षाही पाकिस्तान व चीनकडे अधिक अण्वस्त्रे, जगात रशियाकडे सर्वाधिक शस्त्रे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (सिपरी) या संस्थेने जगभरातील आण्विक शस्त्रांची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. या माहितीनुसार चीनकडे ३५०, पाकिस्तानकडे १६५ आणि भारताकडे १५६ आण्विक शस्त्रास्त्रे असल्याची नोंद आहे. जगातील नऊ देश अण्वस्त्र सज्ज आहेत. हे सर्व देश मिळून सध्या १३ हजार ८० आण्विक शस्त्र आहेत.Chin and Pakistan have more nuclear weapons

    यामध्ये रशिया अव्वल असून त्यांच्याकडे सहा हजार २५५ अण्वस्त्र आहेत. ‘सिपरी’ने केलेल्या मूल्यांकनानुसार अण्वस्त्र सज्जतेत रशिया पहिल्या व अमेरिका पाच हजार ५५० अण्वस्त्रांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.



    जगातील एकूण आण्विक शस्त्रांपैकी ९० टक्के शस्त्रसाठा या दोन्ही बलाढ्य देशांमध्ये आहे. या दोन्ही देशांसह ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, इस्राईल आणि उत्तर कोरिया हे देशही आण्वििक शस्त्रांनी संपन्न आहेत.

    ‘रशिया व अमेरिका वगळतता अन्य अण्वस्त्रसज्ज देशांत अजूनही आण्विक शस्त्रे तयार होत असून ती तैनात करण्यात येत आहेत. अण्वस्त्रांच्या साठ्यात भर टाकण्यात आणि त्याचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने निम्मी वाटचाल चीनने केली आहे, भारत व पाकिस्तानही त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा विस्तार करीत आहे,’ असे ‘सिपरी’ने म्हटले आहे.

    फ्रान्सकडे २९०, ब्रिटनकडे २२५ आण्विक शस्त्रे असून इस्राईल-९०, उत्तर कोरियात ४० ते ५० एवढी संख्या आहे. प्रत्येक देश त्यांचा अण्वस्त्र कार्यक्रम गुप्त ठेवत असल्याने ही आकडेवारी अचूक असेल, असा दावा करता येणार नाही, असेही यात म्हटले आहे.

    Chin and Pakistan have more nuclear weapons

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली