• Download App
    छिंदमने शिवाजी महाराजांबद्दल गलिच्छ भाषा वापरलीच, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातून स्पष्ट|Chhindam used foul language about Shivaji Maharaj, as evidenced by the forensic lab report

    छिंदमने शिवाजी महाराजांबद्दल गलिच्छ भाषा वापरलीच, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातून स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर: नगरचा माजी उपमहापौर आणि नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमधील आवाज छिंदम याचाच असल्याचा फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.Chhindam used foul language about Shivaji Maharaj, as evidenced by the forensic lab report

    तपास अधिकारी तोफखाना पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे यांनी हे साठ पानांचे दोषारोपपत्र सोमवारी नगरच्या न्यायालयात दाखल केले. फेब्रुवारी २०१८ मध्ये हा गुन्हा घडला होता. गुन्हा घडला तेव्हा छिंदम उपमहापौरपदावर होता.



    त्यामुळे त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी गृहविभागाची परवानगी हवी असते. ती मिळविण्याची प्रदीर्घ प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. त्यानंतर लगेचच हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

    हा गुन्हा ऑडिओ क्लिपवर आधारित आहे. बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना छिंदम याने शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारले होते. छिंदम उपमहापौर असल्याने त्यांनी बिडवे यांना फोन करून एक काम सांगितले.

    मात्र, त्यावेळी शिवजयंती जवळ आली होती. त्यामुळे महापालिकेची संबंधित यंत्रणा त्या तयारीत असून ते काम झाले की, तुमचे करतो, असे बिडवे फोनवर छिंदमला सांगत होते. त्या दरम्यान छिंदम याने एकदम संतापून शिवरायांबद्दल गलिच्छ भाषा वापरली. बिडवे यांनाही शिवीगाळ केली.

    ही ऑडिओ क्लिप नंतर व्हायरल झाली. याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी फिर्याद दिली होती. त्यावरून हा गुन्हा दाखल झालेला आहे. या क्लिपचा वापर मुख्य पुरावा म्हणून होणार आहे.

    पोलिसांनी तपासात ही क्लिप आणि छिंदम याच्या आवाजाचे नमुने घेऊन फॉरेन्सिक लॅबला पाठविले होते. त्याचा अहवालही मिळाला असून तो पुरावा पोलिसांनी दोषारोपपत्रासोबत जोडला आहे. याशिवाय अन्य सहा साक्षीदारांचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत.

    Chhindam used foul language about Shivaji Maharaj, as evidenced by the forensic lab report

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य