• Download App
    कोब्रा जवान राकेश्वर सिंग मन्हास सुखरूप विजापूरच्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये दाखल; जम्मूतल्या घरी जोरदार सेलिब्रेशन | Chhattisgarh: CoBRA jawan Rakeshwar Singh Manhas brought to CRPF camp, Bijapur after he was released by naxals

    कोब्रा जवान राकेश्वर सिंग मन्हास सुखरूप विजापूरच्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये दाखल; जम्मूतल्या घरी जोरदार सेलिब्रेशन

    वृत्तसंस्था

    जम्मू – सीआरपीएफशी सुकूमाच्या जंगलात झालेल्या चकमकीनंतर नक्षलवाद्यांनी अपहरण करून जंगलात नेलेल्या राकेश्वर सिंग मन्हास या कोब्रा जवानाची नक्षलवाद्यांनी सुटका केली आणि तो विजापूरमधील सीआरपीएफ कॅम्पमध्ये सुखरूप दाखल झाला आहे. त्यांच्या सुटकेची माहिती मिळताच जम्मूतील त्यांच्या घरी जोरदार सेलिब्रेशन सुरू झाले असून आसपासचे नागरिकही या सेलिब्रेशनमध्ये सामील झाले आहेत. Chhattisgarh: CoBRA jawan Rakeshwar Singh Manhas brought to CRPF camp, Bijapur after he was released by naxals

    राकेश्वर सिंग मन्हास यांची पत्नी मीनू यांनी आपल्या जवान पतीच्या सुखरूप सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला असून सरकारचे आभार मानले आहेत. सरकारवर आमचा विश्वास होता. पण सरकारचे प्रतिनिधी काही बोलत नव्हते. स्वाभाविक आहे, काही गुप्त गोष्टी ते बाहेर सांगत नसतील, हे मी समजू शकते. पण आता आमचे वाईट दिवस सरले आहेत. ते आले की त्यांचे जोरदार स्वागत करू, अशा शब्दांमध्ये मीनू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.



    राकेश्वर सिंग मन्हास या जवानाचे तीन दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी चकमकीच्या वेळी अपहरण केले होते. त्याचा फोटो रिलीज करून नक्षलवाद्यांनी सरकारशी चर्चेची तयारी केली होती पण त्यासाठी मध्यस्थ जाहीर करण्याची अट घातली होती. अर्थात ही अट मान्य झाली किंवा नाही, याची अधिकृत माहिती नाही. पण नक्षलवाद्यांनी मन्हास या जवानाची सुटका केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली होती. नंतर तिच्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले.

    आम्ही गेले तीन – चार दिवस फार वाईट मनःस्थितीत काढले. हा माझ्या जीवनातला अत्यंत आनंदाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया राकेश्वर सिंग याची पत्नी मीनू यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी आपल्या पतीच्या सूटकेसाठी जम्मूमध्ये आंदोलनही केले होते.

    नक्षलवादी आणि सीआरपीएफ यांच्यात झालेल्या दीर्घ चकमकीत २२ जवान शहीद झाले होते. पण त्याच मोहिमेत २५ ते ३० नक्षवादीही मारले गेले होते. चार ट्रॅक्टर ट्रॉल्या भरून नक्षलवाद्यांनी मृतदेह जंगलात नेल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले होते. त्याचवेळी कोब्रा जवान राकेश्वर सिंग मन्हास याचे अपहरण झाल्याचीही माहिती त्यांनी दिली होती. त्याच्या सुरक्षित सुटकेसाठी सरकार प्रयत्न करेल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली होती. त्यानुसार आज नक्षलवाद्यांनी जवानाची सुटका केली. त्यानंतर तो विजापूरच्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये दाखल झाला.

    Chhattisgarh: CoBRA jawan Rakeshwar Singh Manhas brought to CRPF camp, Bijapur after he was released by naxals

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट