ही घटना घडली त्यावेळी कारखान्यात ८० कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान केमिकलच्या गळतीमुळे २० जणांची प्रकृती खालावली. Chemical leak in Karnataka, 22 workers in critical condition
विशेष प्रतिनिधी
कर्नाटक : कर्नाटकातील मंगळुरूमध्ये एव्हरेस्ट फिश प्रोसेसिंग प्लांटमध्ये केमिकलची गळती झाली आहे.तसेच ही घटना घडली त्यावेळी कारखान्यात ८० कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान केमिकलच्या गळतीमुळे २० जणांची प्रकृती खालावली. त्यानंतर कर्मचाऱ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
या कर्मचाऱ्यांना सध्या श्रीनिवास मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे.आज सकाळी झालेल्या अपघातानंतर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.