• Download App
    पश्चिम बंगालवर केंद्र सरकारची नजर कायम, हिंसाचाराच्या चौकशीसाठी बंगालमध्ये पथक।Central govt. sent team in west Bengal for probe

    पश्चिम बंगालवर केंद्र सरकारची नजर कायम, हिंसाचाराच्या चौकशीसाठी बंगालमध्ये पथक

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर उसळलेल्या हिंसाचाराची पाहणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचे चार अधिकाऱ्यांचे पथक आज बंगालमध्ये पाठवण्यात आले. त्यांच्याकडून येणाऱ्या अहवालानंतर बंगालमध्ये पुन्हा केंद्रीय सुरक्षा दल तैनात करायची का, याचा निर्णय केंद्र सरकार करेल. गृहमंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांच्या नेतृत्वाखालील चार जणांचे हे पथक आज बंगालकडे रवाना झाले.  Central govt. sent team in west Bengal for probe



    गृहमंत्रालयाने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारला यापूर्वीही अहवाल मागविला होता. मात्र राज्याने तो न पाठविल्याबद्दल मंत्रालयाने स्पष्ट नापसंती व्यक्त केली आहे. त्यानंतर राजाला पाठवलेल्या स्मरणपत्रात गृहमंत्रालयाने हिंसाचाराच्या घटना तत्काळ रोखण्यासाठी त्वरित पावले उचलण्यास ममता बॅनर्जी सरकारला सांगितले आहे.

    विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार पुन्हा उफाळला आहे. यात आतापावेतो किमान सहा लोकांचा बळी गेला आहे आणि भाजपकडून ही संख्या १२ किंवा त्याच्यापेक्षा जास्त इतकी सांगितली जात आहे. सत्तारूढ तृणमूलच्या गुंडांकडून भाजपचाच कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले होत आहेत असेही भाजपतर्फे सांगितले जाते.

    Central govt. sent team in west Bengal for probe

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले