• Download App
    काश्मिरात अल्पसंख्याकांची हत्या करणाऱ्यांविरुद्ध केंद्राचे मोठे पाऊल, शोधमोहीम राबवून दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे सैन्याला निर्देश । Central govt actions against target killings in jammu kashmir, amit shah ajit doval meeting

    काश्मिरात अल्पसंख्याकांची हत्या करणाऱ्यांविरुद्ध केंद्राचे मोठे पाऊल, शोधमोहीम राबवून दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे सैन्याला निर्देश

    target killings in jammu kashmir : जम्मू -काश्मीरमध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांना टार्गेट करून हत्या करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूट केंद्राने सुरक्षा दलांना दिली आहे. सुरक्षा दलांना सरकारचे दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे थेट निर्देशच आहेत. केंद्रातील मोदी सरकारने काश्मीर खोऱ्यात निष्पापांच्या हत्या करून दहशत पसरवणाऱ्यांविरुद्ध मोठे पाऊल उचलले आहे. Central govt actions against target killings in jammu kashmir, amit shah ajit doval meeting


    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जम्मू -काश्मीरमध्ये अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांना टार्गेट करून हत्या करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूट केंद्राने सुरक्षा दलांना दिली आहे. सुरक्षा दलांना सरकारचे दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे थेट निर्देशच आहेत. केंद्रातील मोदी सरकारने काश्मीर खोऱ्यात निष्पापांच्या हत्या करून दहशत पसरवणाऱ्यांविरुद्ध मोठे पाऊल उचलले आहे.

    काश्मीर खोर्‍यातील अल्पसंख्य हिंदू आणि शीख समुदायातील लोकांच्या टारगेट किलिंगमुळे सांप्रदायिक सलोखा नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. पाक पुरस्कृत या दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी केंद्राने आता कठोर पाऊल उचलले आहे.

    सहा दिवसांत 7 निष्पापांचा बळी

    गेल्या 6 दिवसांत काश्मिर खोऱ्यात 7 निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. त्यापैकी 6 शहरांत ठार झाले आहेत. मृतांपैकी चार अल्पसंख्याक समाजातील होते. रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएस) ने या दहशतवादी घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. ही संघटना जम्मू -काश्मीरमधील कलम 370च्या उच्चाटनानंतर अस्तित्वात आली. या संघटनेला पाकिस्तानचे समर्थन आहे. गुप्तचर संस्था आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) चार दहशतवादविरोधी आणि गुप्तचर पथके श्रीनगरमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांना पिन-पॉइंट कारवाईद्वारे या दहशतवादी मोड्यूल्सचा नायनाट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    याशिवाय, दंगलरोधी पथक, केंद्रीय राखीव पोलिस दलाला (सीआरपीएफ) श्रीनगरमध्ये सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) सीमापार घुसखोरी रोखण्यास सांगण्यात आले आहे.

    सुरक्षा दलाकडून मोठी शोधमोहीम

    जम्मू -काश्मीरमधील नागरिकांवर वाढत्या हल्ल्यादरम्यान श्रीनगरच्या ईदगाह परिसरात दहशतवाद्यांनी महिला मुख्याध्यापकासह सरकारी शाळेच्या शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना लक्ष्य केल्याच्या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण श्रीनगर शहरात मोहीम राबवली आहे.

    Central govt actions against target killings in jammu kashmir, amit shah ajit doval meeting

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य