विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे म्हटले आहे. पक्षाचे प्रभारी हरीश रावत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री चांगलेच नरमले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी आपली बंडाची तलवार म्यान केयाचे मानले जाते.Caption Amrindar singh backfooted
पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हिंदू नेत्याची निवड करावी अशी आग्रही मागणी कॅ. अमरिंदरसिंग यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष ही दोन्ही पदे जर शीख समुदायाकडे राहिली तर बहुसंख्य हिंदू नाराज होतील, अशा प्रकारची भीती देखील कॅ. अमरिंदरसिंग यांनी पक्षश्रेष्ठींसमोर व्यक्त केली होती. यामुळे त्यांचा सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष करण्यास विरोध आहे.
दुसरीकडे नवज्योतसिंग सिद्धू यांनी देखील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून ते सातत्याने आमदार आणि मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांची पंचकुला येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्रित माध्यमांना सामोरे जात परस्परांची गळाभेट देखील घेतली.
तत्पूर्वी कॅ. अमरिंदरसिंग यांनी शुक्रवारी काँग्रेस हायकमांडला लिहिलेल्या पत्रामध्ये पंजाबमधील हस्तक्षेप महागात पडेल, असा धमकीवजा इशाराच दिला होता. हे पत्र माध्यमांत व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते.
Caption Amrindar singh backfooted
महत्त्वाच्या बातम्या