• Download App
    कॅप्टनने सिध्दूंवर सोडले त्यांचे मंत्री, अमरिंदर सिंग यांचे मंत्री अंगावर आल्यावर नवज्योतसिंग सिध्दू चिडीचूूप|Captain leaves Sidhu to his minister, Navjot Singh Sidhu irritates when Amarinder Singh's minister attacked on him

    कॅप्टनने सिध्दूंवर सोडले त्यांचे मंत्री, अमरिंदर सिंग यांचे मंत्री अंगावर आल्यावर नवज्योतसिंग सिध्दू चिडीचूूप

    पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांच्यावर सातत्याने टीका करणाºया नवज्योत सिध्दू यांच्यावर आता मंत्र्यांनी हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री बनायचे असेल तर कॉँग्रेस सोडून दुसरा पक्ष काढा असे या मंत्र्यांनी म्हटल्यावर सिध्दू चिडीचूप झाले आहेत.Captain leaves Sidhu to his minister, Navjot Singh Sidhu irritates when Amarinder Singh’s minister attacked on him


    विशेष प्रतिनिधी

    अमृतसर : पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या नवज्योत सिध्दू यांच्यावर आता मंत्र्यांनी हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री बनायचे असेल तर कॉँग्रेस सोडून दुसरा पक्ष काढा असे या मंत्र्यांनी म्हटल्यावर सिध्दू चिडीचूप झाले आहेत.

    सिद्धू यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्यांनी स्वत:चा स्वतंत्र पक्ष स्थापन करून त्या पक्षाचे नेतृत्व करावे. काँग्रेसमध्ये राहायचे असल्यास नेतृत्वाचा आदर करण्यासोबत शिस्तही पाळावी लागेल,



    असा हल्लाबोल मंत्र्यांनी सिद्धू यांच्यावर हल्ला चढविला. विरोधाची धार तीव्र होत असल्याचे पाहून सिद्धू यांनी चुप्पी साधली आहे.अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये आलेले सिद्धू हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान होण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यांना आरसा दाखविणे जरुरी आहे.

    मंत्री साधू सिंग धर्मसोत यांनी म्हटले की, काँग्रेस पक्ष चांगला वाटत नसेल, तर सिद्धू यांनी खुशाल दुसºया पक्षात जावे. हे जमत नसेल तर त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करून अध्यक्ष व्हावे.

    कॅबिनेट मंत्री सुंदर श्याम अरोडा म्हणाले, सिद्धू् यांनी सातत्याने मुख्यमंत्र्यांवर टीका करणे, हे पक्ष शिस्तविरोधी आहे. त्यांनी पक्ष शिस्त पाळून पक्षाच्या धोरणांचा आदर करण्याचा सल्ला दिला.

    प्रत्येकाने पक्षाला परिवारच समजले पाहिजे. स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी पक्षाची प्रतिमा मलिन करणे योग्य नाही, असा टोला मंत्री तृप्त राजिंदर सिंह बाजवा यांनी लगावला.

    महसूल मंत्री सुखविंदर सिंग सुख सरकारिया म्हणाले की, सिद्धू यांना फक्त पदाची हाव आहे. पक्षाशी काहीही देणे-घेणे नाही. बरगाडी पोलीस गोळीबार प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले आहे.

    Captain leaves Sidhu to his minister, Navjot Singh Sidhu irritates when Amarinder Singh’s minister attacked on him

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!