• Download App
    दोन्ही हल्ले भारतावरचेच; पण भांडण भारतीय नेत्यांमध्ये; 26 /11 चा हल्ला - चिनी अतिक्रमण यावरून दोन काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली!! । Both attacks are on India; But the quarrel between Indian leaders; 26/11 Attack - Two Congress Leaders Join in on Chinese Encroachment !!

    दोन्ही हल्ले भारतावरचेच; पण भांडण भारतीय नेत्यांमध्ये; २६ /११ चा हल्ला – चिनी अतिक्रमण यावरून दोन काँग्रेस नेत्यांमध्ये जुंपली!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : 26 /11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला आणि चीनचे अरुणाचल प्रदेशातील अतिक्रमण हे दोन्ही हल्ले भारतीयांविरुद्धच असताना या मुद्द्यांवरून मात्र दोन काँग्रेस नेत्यांमध्येच भांडण जुंपले आहे. Both attacks are on India; But the quarrel between Indian leaders; 26/11 Attack – Two Congress Leaders Join in on Chinese Encroachment !!

    खासदार मनीष तिवारी आणि काँग्रेसचे लोकसभेत गटनेते खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यात वर उल्लेख केलेल्या दोन मुद्द्यांवरून वाद-विवाद झाला आहे. मनीष तिवारी यांनी आपल्या नव्या पुस्तकात मुंबई वरच्या 26 /11 हल्ल्यासंदर्भात भाष्य केले आहे. त्यावेळी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रतिकार त्यावेळच्या यूपीए सरकारने कठोरपणे केला नाही. त्यावेळीच पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता, अशा शब्दांमध्ये मनीष तिवारी यांनी टीकास्त्र सोडले आहे.

    त्यावर अधीर रंजन चौधरी यांनी मनीष तिवारी यांना 26 /11 चा हल्ला जुना झाला. आता चीनने भारतावर आक्रमण करून अरुणाचल प्रदेश मधला भाग बळकावला आहे. तिथे एक गाव वसवले आहे, याकडे लक्ष केंद्रित करा, असे सुनावले आहे.



    त्याला मनीष तिवारी यांनी ट्विटरद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. चीनी अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून मी केंद्रातल्या मोदी सरकारला प्रश्न विचारलेच आहेत. ते जरा वाचा, असे सांगत मनीष तिवारी यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून मोदी सरकारला विचारलेल्या प्रश्नांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

    एकूण 26 /11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला काय किंवा चिनी अतिक्रमण काय हे दोन्ही हल्ले भारताविरोधातच आहेत. परंतु या मुद्द्यांवर भारतातलेत नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत.

    Both attacks are on India; But the quarrel between Indian leaders; 26/11 Attack – Two Congress Leaders Join in on Chinese Encroachment !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची