• Download App
    सनी लियोनीचा मधुबन में राधिका नाचे गाण्यातील फोटो वापरणे|Bold steps on Madhuban Mein Radhika dance song, demand for arrest of Sunny Leone, urge action against Salman too

    मधुबन में राधिका नाचे गाण्यावर बोल्ड स्टेप्स, सनी लियोनीच्या अटकेची मागणी, सलमानवरही कारवाईचा आग्रह

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मधुबन मे राधिका नाचे या गाण्यातील बोल्ड स्टेप्समुळे बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी अडचणीत आली आहे. सोशल मीडिया यूजर्सकडून हिंदूंच्या भावनांसोबत खेळ खेळला जात असल्याचा आरोप करुन अभिनेत्रीच्या अटकेची मागणी केली आहे.Bold steps on Madhuban Mein Radhika dance song, demand for arrest of Sunny Leone, urge action against Salman too

    सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर अभिनेत्री सनी लियोनीच्या अटकेची मागणी करण्यासह बिग बॉस रिएलिटी शो होस्ट करणारा अभिनेता सलमान खानवरही राग व्यक्त केला जात आहे. सोशल मीडिया यूजर्स बिग बॉसच्या मंचावरुन या गाण्याचे प्रमोशन केल्याबद्दल सलमान खानवर टीका करत आहेत. अनेकांनी याबाबत सलमान खानवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.



    सनी लियोनीने सनातन धमार्चा अपमान केला आहे. या गाण्याद्वारे राधाच्या प्रतिमेवर चिखल उडवण्याचा प्रयत्न केला गेला. सनी लिनयोनीसह गाण्याशी संबंधित सर्वांना तात्काळ अटक करा, असं एका यूजरने म्हटलं आहे. हिंदूंच्या भावनेशी सातत्याने खेळ केला जात आहे.

    या अश्लील आणि घाणेरड्या आयटम नंबरला सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवरुन हटवलं पाहिजे, अशी मागणी केली आहे.सनी लियोनीच्या ज्या गाण्यावर सध्या वाद निर्माण झाला आहे, ते 1960 मध्ये आलेला चित्रपट कोहिनूर मधील मधुबन में राधिका नाचे या गाण्याचा रिमेक आहे.

    गायिका कनिका कपूर आणि गायक अरिंदम चक्रवर्ती यांनी गायलं आहे. तर गणेश आचार्य यांनी हे गाणं कोरियोग्राफ केलं आहे. हे गाणं श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमावर आधारित आहे. लोकांचं मत आहे की सनी लियोनीच्या बोल्ड डान्समुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.

    Bold steps on Madhuban Mein Radhika dance song, demand for arrest of Sunny Leone, urge action against Salman too

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!