• Download App
    नितीन गडकरी म्हणाले, फुकट दिले तर लोकांना हरामाचा माल वाटतो|Nitin Gadkari said, "If you give it for free, people will think it is not worthy

    नितीन गडकरी म्हणाले, फुकट दिले तर लोकांना हरामाचा माल वाटतो

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : फुकट दिलं, तर लोकांना वाटतं हरामचा माल आहे. फुकटचं कुणालाच काही द्यायचं नाही, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.नागपुरात नितीन गडकरींच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचा समारोप झाला.Nitin Gadkari said, “If you give it for free, people will think it is not worthy

    यावेळी नितीन गडकरींनी संबोधित करताना कृषी प्रदर्शनाच्या आयोजकांना उद्देशून म्हणाले, फुकटंच कुणाला काहीच द्यायचं नाही, नाही तर लोकांना वाटतं हरामचा माल आहे. त्यामुळेच कृषी प्रदर्शनात यायला मोफत बसेस दिल्या नाही.



    कृषी प्रदर्शनासाठी मोफत बस मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र ती काही मान्य करण्यात आली नव्हती. असं नेमकं का करण्यात आलं, त्याचं उत्तर नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात बोलताना दिलं आहे.

    प्रदर्शनासाठी यायला लोकांना सोयीचं जावं, यासाठी मोफत बस सेवा मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र तसं केलं तर लोकांना या कृषी प्रदर्शनाची किंमत उरणार नाही, असं म्हणत नितीन गडकरींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

    शेतकऱ्यांना आवाहन करताना गडकरी म्हणाले, वीज निर्मिती प्रकल्पात बांबूचा वापर झाल्यास विदभार्तील शेतकºयांनाा मोठा फायदा होईल. फ्लेक्स इंजिनची आजच ऑर्डर निघाली आहे.

    पेट्रोल इंजिन बनवणाऱ्या कंपन्यांची दिल्लीत लवकरच बैठक घेऊन त्यांना तीन चार महिन्यात फ्लेक्स इंजिन तयार करण्यास सांगणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनीच इथेनॉलचे पंप चालवावेत. गावातील तरुणाला रोजगार मिळाला तर गावाची आर्थिक स्थिती सुधारेल.

    Nitin Gadkari said, “If you give it for free, people will think it is not worthy

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!

    राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!