• Download App
    भाजप अध्यक्ष नड्डांनी दाखवला काँग्रेसला आरसा : म्हणाले- आधी पक्ष जोडा, नंतर 'भारत जोडो'बद्दल बोला|BJP president Nadda showed a mirror to the Congress said- First join the party, then talk about 'Join India'

    भाजप अध्यक्ष नड्डांनी दाखवला काँग्रेसला आरसा : म्हणाले- आधी पक्ष जोडा, नंतर ‘भारत जोडो’बद्दल बोला

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी अलीकडच्या काळात पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रा वगैरेबद्दल बोलण्याच्या आधी काँग्रेसने पक्षातील गळती थांबवावी, आधी पक्ष जोडावा, असा सल्ला भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिला आहे. हरियाणातील कैथल येथे शुक्रवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.BJP president Nadda showed a mirror to the Congress said- First join the party, then talk about ‘Join India’

    काँग्रेसला आता कोणताही तात्त्विक असा आधार नाही किंवा हा राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षदेखील राहिलेला नाही. हा पक्ष आता बहीण-भावापुरता संकोचला गेला आहे. एका परिवारापुरता राहिला आहे, अशी टीका नड्डा यांनी केली. गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडल्याविषयी नड्डा म्हणाले, ५० वर्षे पक्षासाठी खर्ची घातलेल्या लोकांना पक्ष का सोडावा लागत आहे, याचा तुम्ही विचार केलाय? काँग्रेसचे नेते आता भारत जोडोचे आवाहन करत आहेत. आधी तुमच्या पक्षाला एकजूट करून दाखवा.



    भारत जोडो अभियान राबवण्याऐवजी ‘काँग्रेस जोडो’ मोहीम राबवण्याची खरी गरज असल्याचे नड्डा यांनी सांगितले. पुढील आठवड्यापासून काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला कन्याकुमारीतून सुरुवात होणार आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही यात्रा असेल.

    यात्रा ३ हजार ७५० किलोमीटर आणि १५० दिवसांची आहे. काँग्रेसासारखीच शिवसेनादेखील आता परिवारापुरती मर्यादित पार्टी झाली आहे. खऱ्या शिवसेनेने त्यांची साथ सोडली आहे, अशी टीका नड्डांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य लोकांच्या आयुष्यात बदल घडवू पाहत आहेत.

    BJP president Nadda showed a mirror to the Congress said- First join the party, then talk about ‘Join India’

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत