१९७६मध्ये सुब्रमण्यम स्वामींना बडतर्फ करण्यात आल्याचे दिले आहे उदाहरण
प्रतिनिधी
नवी दिल्ली – Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी हे मागील काही दिवसांपासून त्यांच्या विविध विधानांमुळे देशभरात चर्चेत आणि भाजपा नेत्यांच्या टीकेचे धनी बनले आहेत. राहुल गांधी यांनी देशात व देशाबाहेर म्हणजेच लंडनमध्ये केलेल्य विधानांवरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान, आता त्यांचे संसद सदस्यत्वही धोक्यात येण्याची चिन्हं दिसत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. BJP MP Nishikant Dubey demands termination of Rahul Gandhi Lok Sabha membership
वृत्तसंस्था एएनआयने शुक्रवारी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, भाजपा खासदार निशिकांत दुबे शुक्रवारी लोकसभेच्या विशेषाधिकार समितीसमोर हजर झाले आणि त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली.
खासदार निशिकांत दुबे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी दिशाभूल करणारी, बदनामीकारक, असंसदीय आणि आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल ‘प्रिव्हिलेज मोशन’ची मागणी केली.
लोकसभा खासदार सुनील सिंह यांनी निशिकांत दुबे यांना साक्षीदार म्हणून समितीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. पॅनल प्रमुख सुनील सिंह यांच्याशिवाय आज उपस्थित असलेल्या समितीच्या इतर सदस्यांमध्ये टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी, काँग्रेसचे के. सुरेश, सीपी जोशी, दिलीप घोष, राजू बिस्ता आणि भाजपचे गणेश सिंह उपस्थित होते.
या मुद्द्यावर आपल्या युक्तिवादात निशिकांत दुबे म्हणाले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभारप्रदर्शन सुरू असतानाही राहुल गांधींचे उत्तर मुख्यत्वे गौतम अदानीबद्दल होते आणि खरेतर अदानी यांचा उल्लेख राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात किमान ७५ वेळा केला होता.
याचबरोबर निशिकांत दुबेंनी १९७६ मधील त्या घटनेचाही दाखला दिला, जेव्हा सुब्रमण्यम स्वामी यांना राज्यसभेतून बडतर्फ करण्यात आले होते. जेव्हा संसद आणि पंतप्रधानांविरोधात आरोप करण्यात आले होते. निशिकांत दुबे यांनी सांगितले की आताही अशीच परिस्थिती आहे. पंतप्रधानांच्या वर्तनावर टीका करणे म्हणजे लोकशाही कमकुवत होण्यासारखे आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी –
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना, ‘’अदाणी आणि पंतप्रधानांचं संबंध काय आहेत? मी सांगतो, काही वर्षांपूर्वी नरेंद्र मुख्यमंत्री असताना अनेकांनी मोदींचा विरोध केला. पण, तेव्हा अदाणी मोदींच्या बाजूने उभे राहिले. २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर खरी जादू सुरु झाली. काही वर्षातच अदाणी जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर पोहचले,” असा आरोप राहुल गांधींनी केला होता.
BJP MP Nishikant Dubey demands termination of Rahul Gandhi Lok Sabha membership
महत्वाच्या बातम्या
- स्वयंघोषित काँग्रेस युवराजाने सर्व मर्यादा ओलांडल्या!, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी घेतला राहुल गांधींचा समाचार
- “देशाचा अपमान मान्य नाही..”: राहुल गांधींच्या माईक बंद करण्याच्या वक्तव्यावर उपराष्ट्रपती संतापले
- ओवैसींना बी टीम म्हणून हिणवताना पवारच बनलेत का भाजपची बी टीम??
- रामचंद्र पौडेल नेपाळचे नवे राष्ट्रपती; १७ वेळा पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत झाले आहेत पराभूत