अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने देऊ केलेली मदतही अतिशय तोकडी असल्याने त्याविरोधात भाजपने रान उठवले आहे. चिखलीच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी बळीराजाला आर्थिक मदतीच्या मागणीसाठी राज्य सरकारविरोधात अनोखे आंदोलन केले.BJP MLA Shweta Mahale Agitaion Agains Maha Vikas Aaghadi Govt For Farmers
प्रतिनिधी
बुलढाणा : अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने देऊ केलेली मदतही अतिशय तोकडी असल्याने त्याविरोधात भाजपने रान उठवले आहे. चिखलीच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी बळीराजाला आर्थिक मदतीच्या मागणीसाठी राज्य सरकारविरोधात अनोखे आंदोलन केले.
आ. श्वेता महाले यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी केली. बेसन-भाकर खाऊन तसेच काळे कंदील दाखवून राज्य सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा, अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे.
चिखली विधानसभा क्षेत्रात अतिवृष्टी झाली. यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. मात्र, अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळाली नाही. गेल्या आठवड्यात भाजपच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्याच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा दिला होता. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरसकट मदत मिळाली नाही, तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्याचं दिवाळ काढलं आहे. बळीराजा हा उदार आहे. पण या बळीराजाचं बळी घेण्याचं काम या महाविकास आघाडीनं केलं आहे. त्यामुळं या महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. यावेळी सरकारचा निषेध करण्यासाठी काळे झेंडे दाखविण्यात आले.
आमदार महाले यांनी शेतकऱ्यांसोबत पंगतीत बसून त्यांना बेसन, भाकरी खाल्ली. बाजूला महिला शेतकरी होत्या. शेतकऱ्यांना मदत करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे आमदारांना शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनात सहभागी व्हावं लागलं.
BJP MLA Shweta Mahale Agitaion Agains Maha Vikas Aaghadi Govt For Farmers
महत्त्वाच्या बातम्या
- अखिलेश यादव यांना आयएसआयकडून संरक्षण आणि आर्थिक मदत, भाजपच्या मंत्र्यांचा संशय
- केंद्राने बंपर गिफ्ट, भाजपशासित राज्यांनीही पेट्रोल, डिझेलव किंमती कमी केल्या, आता महाराष्ट्रातील आघाडी सरकार करणार का?
- शंकरराव गडाख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याने केली आत्महत्या
- मुलायमसिंह यादव यांच्या परिवारात आता होणार एकी; काका शिवपालांशी अखिलेश यादव करणार युती
- कॉँग्रेसमध्ये मद्यपान केलेले चालणार, नव्या संविधानात दिली जाणार सवलत