वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात हिंदू व मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीच्या दरात १९५१ पासून आतापर्यंत फार फरक दिसलेला नाही. मात्र काही दशकांपासून देशातील सर्व प्रमुख धर्मांच्या नागरिकांच्या जन्मदरात घट होत असलेली आढळले आहे. विशेष करून मुस्लिमांचा जन्मदर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. Birth rate of Muslims decresed in India
अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ या प्रख्यात संस्थेने याबाबत संशोधन केले आहे. भारतात हिंदू व मुस्लिम या धर्मांशिवाय ख्रिस्ती, बौद्ध, आणि जैन समुदायातील जन्मदरही घटला आहे, असे संशोधनपर अहवालात म्हटले आहे.
भारतात मुस्लिम समाजात जन्मदर जास्त असल्याचे मानले जाते. तो तसाच राहिला तर भारतातील एकूण लोकसंख्येत मुस्लिमांची संख्या जास्त असेल, असेही म्हटले जाते. पण या सर्व गोष्टी तथ्यहीन आहेत. त्याला कोणताही आधार दिसत नाही, असा दावा ‘प्यू रिसर्च सेंटर’ने केला आहे. अन्य धर्मांप्रमाणेच मुस्लिमांचा जन्मदरही कमी झाला आहे, असे या संस्थेने म्हटले आहे.
भारतात १९९२ ते २०१५ या कालावधीत मुस्लिमांच्या लोकसंख्येत वेगाने घट झाली आहे. १९९२मध्ये मुस्लिमांचा जन्मदर ४.४ टक्के होता. २०१५मध्ये तो २.६ पर्यंत खाली आला. दुसरीकडे हिंदूचा जन्मदरही ३.३ टक्क्यांहून २.१वर स्थिरावली आहे. तसेच हिंदू व मुस्लिमांच्या जन्मदरातील फरकही कमी झाला असून तो ०.५ टक्के एवढा नोंदविला आहे. हा फरक पूर्वी १.१ टक्का एवढा होता. एकूणच मुस्लीम समाजातील लोकसंख्यावाढ अन्य धर्मांपेक्षा जास्त असली तरी त्यात आता मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे, असे अहवालात नमूद केले आहे.
Birth rate of Muslims decresed in India
महत्त्वाच्या बातम्या
- UNGA मधील मोदींचे संपूर्ण भाषण : संयुक्त राष्ट्रांत पंतप्रधानांनी दहशतवाद, कोरोना आणि अफगाणिस्तानसह या मुद्द्यांवर मांडले मत! वाचा सविस्तर…
- तालिबान इम्रान खानला म्हणाला कठपुतळी , अफगाणिस्तान प्रकरणापासून दूर राहण्याचा दिला सल्ला
- पालघरमधील प्रकार, दलितांच्या अंतयात्रेच्या वेळी गोंधळ करणाऱ्या तीन लोकांना अटक