• Download App
    पंतप्रधान मोदींची लसीकरणाची मोठी घोषणा; १५ ते १८ वयाच्या मुलांना लस तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोसही|Big vaccination announcement by PM Modi

    पंतप्रधान मोदींची लसीकरणाची मोठी घोषणा; १५ ते १८ वयाच्या मुलांना लस तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोसही

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत आज (२५ डिसेंबर) १५ ते १८ वयातील मुलांसाठी लसीकरणापासून बुस्टर (प्रिव्हेंशन) डोसपर्यंत ३ मोठ्या घोषणा केल्या आहेत. अटलजी जयंतीनिमित्त मोदींनी घोषणा केल्या.Big vaccination announcement by PM Modi

    पंतप्रधान मोदी म्हणाले, की १५ ते १८ वयातील मुलांसाठी देशात लसीकरण सुरू होईल. २०२२ मध्ये ३ जानेवारीला सोमवारपासून याची सुरुवात होईल. हा निर्णय करोना विरोधातील देशाच्या लढाईला ताकद देईल.



    Our frontline warriors have played a huge role in our fight against the pandemic. The govt has, thus, also decided that we will begin with precautionary doses for the health workers – from 10th January, 2022.

    – PM @narendramodi pic.twitter.com/PJD1Nl9R0b

    — BJP (@BJP4India) December 25, 2021

    तसेच शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांची काळजीही कमी करेल. आरोग्य कर्मचाऱ्यांचं देशाला सुरक्षित ठेवण्यात मोठे योगदान आहे. त्यामुळे सुरक्षेचा भाग म्हणून सरकारने फ्रंट लाईन वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे, याची सुरुवात १० जानेवारीला सोमवारपासून होईल, असेही मोदींनी नमूद केले आहे.

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले